ससून अपहार प्रकरणात रोखपालच मास्टर माइंड; चार कोटींचा गफला, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ससून अपहार प्रकरणात रोखपालच मास्टर माइंड; चार कोटींचा गफला, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याची संधी साधून रोखपालानेच इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल ४ कोटी १८ लाख ६२ हजारांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बँकखात्यातील रक्कम स्वतःच्या व इतर २३ शासकीय व खासगी व्यक्तींच्या बैंक खात्यावर जमा करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी २५ जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ससून रुग्णालयातील रोखपाल अनिल माने, रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रशासकीय अधिकारी गोरोबा विठोबा आवटे (५५, रा. पिंपळे गुरव) यांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश हिरामणी शिंदे, सचिन ससार, पूजा गराडे, सुलक्षणा चाबुकस्वार, सुनंदा भोसले, सुमन वालकोळी, अर्चना अलोटकर, मंजुषा जगताप, दीपक वालकोळी, सरिता शिर्के, संदेश पोटफोडे, अभिषेक भोसले, संतोष जोगदंड, दयाराम कछोटिया, श्रीकांत श्रेष्ठ, भारती काळे, उत्तम जाधव, संदीप खरात, अनिता शिंदे, सरिता अहिरे, शेखर कोलार, नंदिनी चांदेकर, सरिता लहारे, राखी शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आवटे हे प्रशासकीय अधिकारी असून, त्यांनी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाताला रुग्णालयाच्या शासकीय नोंदीमध्ये तफावत असल्याचे पत्राद्वारे कळवले होते. तसेच तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे सूचित केले. त्यानुसार याप्रकरणी १३ सप्टेंबरला चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या चौकशीत ससूनच्या शासकीय नोंदवहीमध्ये तफावत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. ससून रुग्णालयातील १६ शासकीय नोकर आणि ८ खातेदारांच्या खात्यात ४ कोटी १८ लाख ६२ हजार वर्ग केल्याचे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

प्रशासकीय खात्यातून झालेल्या व्यवहारांचे होणार लेखापरीक्षण
ससून रुग्णालयात उघडकीस आलेल्या ४ कोटी१८ लाखांच्या अपहार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय खात्यातून पूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यातून गेल्या काही वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुखांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या लेखापरीक्षकांनी ससूनमध्ये येऊन सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार संबंधित ससूनमधील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच बारामती येथे बदली झालेल्या या प्रकरणातील संबंधित चार कर्मचाऱ्यांचेही निलंबन करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.

रोखपालनेच रचला डाव
ससूनच्या प्रशासकीय अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभार रोखपाल अनिल माने याच्याकडे होता. त्यावेळी त्याने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ कालावधीत बँक खात्यातील व्यवहारात अपहार केला. त्याने खात्यातील ४ कोटी १८ लाख रुपये ससूनमधील १६ कर्मचारी आणि ८ खासगी व्यक्तींच्या खात्यावर जमा केले. त्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांनी एकाच बँकखात्यात जमा केली. याबदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांना ठरावीक रक्कम देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती