बाप्पाच्या आगमनाला उपस्थित असलेला वरुणराजा विसर्जनलाही हजेरी लावणार; राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बाप्पाच्या आगमनाला उपस्थित असलेला वरुणराजा विसर्जनलाही हजेरी लावणार; राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षात सरासारीइतका पाऊस झाला आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. तर राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणरायाच्या स्वागताला वरुणराजाची उपस्थिती होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता गणेश विसर्जनावेळीही वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच पावसाने मागील आठवड्यापासून विश्रांती घेतली आहे. मात्र, आता गणेशविसर्जनापासून पाऊस राज्यात पुन्हा हजेरी लावणार असून आगामी आठवड्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

गणेश विसर्जनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा खान्देश तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात पावसाचा जोर हलक्या व मध्यम स्वरुपाचा राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?