“हिंदू समाज देशाचा कर्ताधर्ता, देशात काहीही चुकीचं घडलं तर…”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

“हिंदू समाज देशाचा कर्ताधर्ता, देशात काहीही चुकीचं घडलं तर…”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

हिंदू असणे म्हणजे उदार असणे आणि प्रत्येकाप्रती सद्भावना दाखवणे. मग त्यांची धार्मिक श्रद्धा, जात किंवा आहारपद्धती काहीही असो, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राजस्थानमधील अलवर येथे आयोजित एका कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाज देशाचा कर्ताधर्ता आहे असेही म्हटले. देशात काहीही चुकीचे घडले तर त्याचा थेट परिणाम हिंदू समाजावर होतो. कारण हिंदू समाजच देशाचा कर्ताधर्ता आहे. परंतु देशात काही चांगले घडले तर हिंदूंचाही अभिमान वाढतो, असेही भागवत म्हणाले.

सामान्यत: ज्याला हिंदू धर्म म्हटले जाते तोच वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे आहे. हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जो सगळ्यांना सामावून घेतो, सर्वांप्रती सद्भावना दाखवतो आणि या मुल्यांचा वासरा हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून मिळालेला आहे, असेही भागवत म्हणाले.

तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या! मोहन भागवत यांचं विधान, रोख कुणाकडे?

हिंदू आपल्या शिक्षणाचा वापर कोणालाही कमी लेखण्यासाठी करत नाही, तर ज्ञान वाटण्यासाठी करतो, संपत्तीचा उपयोग उपभोगासाठी नाही तर परोपकारासाठी करतो आणि शक्तीचा वापर दुर्बलांच्या रक्षणासाठी करतो. जो कुणी या मुल्यांसह आणि संस्कृतीसह जगतो त्याला हिंदू मानले जाऊ शकते. मग भलेही तो कोणाचीही पूजा करतो, कोणतीही भाषा बोलो. त्यांची जात, क्षेत्र व आहार-व्यवहार काहीही असो, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि… अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
अभिनेत्री निया शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला...
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?
Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्यांविरोधात आता ED कडून गुन्हा दाखल
Photo – निऑन यलो गाऊनमध्ये मृणालचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ