मुंबईत असूनही अजित पवार यांनी अमित शहांसोबत लालबागच्या दर्शनाला जाणं टाळलं, नक्की कारण काय?

मुंबईत असूनही अजित पवार यांनी अमित शहांसोबत लालबागच्या दर्शनाला जाणं टाळलं, नक्की कारण काय?

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत चालली आहे तशी महायुतीत फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. महायुतील पक्षांचा एकमेकांशी ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. वरवर शिंदे-फडणवीस-पवार तिन्ही पक्षात किती आलबेल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे पक्षाचे नेते, प्रवक्ते एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सगळ्यांचे टार्गेट हे अजित पवार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप, मिंधे गट आणि आरएसएसकडून अजित पवार यांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. काही जण त्यांच्यासोबत बसल्याने ओकाऱ्या होतात म्हणतात, तर काही अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक आहे म्हणतात. त्यामुळे तिन्ही पक्षामध्ये कुणाला कुणाचे सोयरसुतक नसल्याचेच दिसते. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले. एकीकडे त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भिंगरी लावल्यागत फिरताहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

अमित शहा यांनी आज वर्षा व सागर बंगल्यावर गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या दर्शनालाही गेले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रातील व राज्यातील नेते होते. परंतु अजित पवार कुठे दिसलेच नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नक्की कारण काय?

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. अशातच त्यांनी आता बारामतीतून लढण्यावर संभ्रम निर्माण केला आहे. बारामतीला नवा आमदार मिळावा, तेव्हा तुम्हाला माझे काम कळेल, असे अजितदादा म्हणाले. यानंतर ते मुंबईत आले. सायंकाळी महायुतीची बैठक होती, ती झाली नाही. त्यानंतर अजितदादांनी शहांच्या गणेशदर्शनाकडे पाठ फिरवली. सातत्याने होणाऱ्या टिकेमुळे ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

महायुतीत महातणाव, गुलाबराव म्हणाले अर्थखाते नालायक

मतांची फोडाफोड करण्यासाठी अजित पवार तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. रोहित पवारांनीही याबाबत दावा केला आहे. अजित पवारांना तिसरी आघाडी करण्याचे आदेश आल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही ते दिल्लीतील जीएसटी बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या शेजारी बसतो बाहेर आल्यावर ओकारी येते – तानाजी सावंत

तिसरी गोष्ट म्हणजे अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तिथे पोहोचले. त्यांनी मनोभावे बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळाने अमित शहा तिथे आले. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांसमोर येण्याचे टाळले असावे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल? तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल, अमित ठाकरे यांचे थेट प्रश्न कुणाला?, ट्विट का होतेय व्हायरल?
बदलापूरमधील नामांकित शाळेमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षय शिंदे याचा सेल्फ...
Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटरचा झाला की केला? मोठी अपडेट समोर
‘बिग बॉस मराठी सीजन 5’ची अंतिम तारीख जाहीर, या दिवशी पार पडणार सोहळा
Akshay Shinde Encounter आज जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद – आदित्य ठाकरे
बिग बॉस मराठी 70 दिवसात संपणार, या दिवशी होणार ग्रँड फिनाले
Badlapur Sexual Assault अक्षय शिंदेबाबत गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे – शरद पवार
Akshay shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…