वाळव्यातील चिकुर्डेच्या स्मशानभूमीत जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला पर्दाफाश; पोलिसांकडून तपास सुरू

वाळव्यातील चिकुर्डेच्या स्मशानभूमीत जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला पर्दाफाश; पोलिसांकडून तपास सुरू

मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, त्यावर मुलींचे फोटो लावून दाभण खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. होळी पौर्णिमेपासून रस्त्यालगत असणाऱया स्मशानभूमीत सुरू असलेला जादूटोण्याचा हा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, निवृत्त उपप्राचार्य बी. आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ. सुदाम माने, विनोद मोहिते यांनी हा प्रकार उघडकीस आणून स्मशानभूमीची स्वच्छता केली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यंत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू, असे कुरळप ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी सांगितले.

‘अंधश्रद्धा निर्मूलन’च्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढले. काळे कापड सोडल्यावर त्यातून नारळ, काळ्या बाहुल्या, लिंबू व मुलींच्या रंगीत फोटोंना टोकदार दाभणातून नारळात खुपसले होते. तर, नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्ठय़ा खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचे नाव लिहिले आहे. अशी पाच गाठोडी आहेत. यांत पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

‘अंनिस’चे विनोद मोहिते म्हणाले, ‘या प्रकारातील फोटो पाहता, सोशल मीडियावरील फोटो घेऊन रंगीत झेरॉक्स काढल्याचे दिसते. आपल्या मुली सोशल मीडियावर फोटो टाकतात, त्याचा दुरुपयोग होतो. या बाबतीत पालकांनी काळजी घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

अंनिसचे संजय बनसोडे यांनी या प्रकरणाचा पोलिसांनी खोल तपास करावा, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड…’ गाण्यात आयुष शर्मा होता बॅकग्राऊंड डान्सर; म्हणाला, ‘लपण्याचा प्रयत्न करत होतो कारण…’ ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड…’ गाण्यात आयुष शर्मा होता बॅकग्राऊंड डान्सर; म्हणाला, ‘लपण्याचा प्रयत्न करत होतो कारण…’
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजे अभिनेता सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा सध्या ‘रुसलान’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन...
सलाईन लावून काम, हार्ट अटॅक बघितले, भारती सिंहने सांगितले अभिनय क्षेत्रातील काळे सत्य आणि..
न्युडिटीबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला ऐश्वर्या रायचं रोखठोक उत्तर; म्हणाली “तू पत्रकार..”
Sara Tendulkar | किती श्रीमंत आहे सचिन तेंडुलकर यांची लेक सारा? कमावते इतके कोटी
‘तारक मेहता..’मधील रोशन सोढी बेपत्ता असल्याप्रकरणी पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती
‘चक धूम धूम’ गाण्यावर माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ
मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार