विजय चौधरीला पोलिसांचा पुरस्कार

विजय चौधरीला पोलिसांचा पुरस्कार

कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलिसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलीस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱया कर्तृत्ववान पोलिसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ हा प्रतिष्ठsचा पुरस्कार जाहीर केला आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणाऱया विजय चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच 2023 साली पॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते. भविष्यातील मोठय़ा कुस्ती स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितले. पोलीस खात्याचा प्रतिष्ठsचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजयवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जयजीत सिंह, निकेत काwशिक, विश्वास नांगरे-पाटील, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विजय चौधरी पोलीस खात्यातही आपला दम घुमवू शकला आहे. सध्या विजय चौधरी आपले गुरू ‘हिंद केसरी’ रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद केसरी’ आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत युगांडा संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या माजी मुंबईकर क्रिकेटपटू अल्पेश रामजानीला (मध्यभागी) ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसने आपल्या पंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. याप्रसंगी ग्रेटेक्स ग्रुपचे व्यवस्थापिक संचालक आलोक हरलालका पंपनीच्या अन्य संचालकासह. 1994 साली मुंबईच्या कांदिवलीत जन्मलेल्या अल्पेशला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी दाखवता यावी म्हणून ग्रेटेक्स ग्रुपने आर्थिक सहकार्यही केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…