महाराणी येसूबाईच्या भूमिकेत अनोखी छाप, मराठमोळी दिसली रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना हिचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकच्या विराजपेट मध्ये झाला. रश्मिका मंदाना हिला एक बहीणही तिचे नाव शिमन मंदाना आहे.रश्मिका हिने तिचे शालेय शिक्षण आपल्या शेजारच्या कर्नाटकातील कोडागू येथील कूर्ग पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर प्री-युनिव्हर्सिटी कोर्स करण्यासाठी म्हैसूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तसेच बंगळुरू येथील एमएस रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे.
कॉलेजमध्ये असताना रश्मिका हिने २०१४ मध्ये 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस'ही सौदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. तिने तिच्या करीयरची सुरुवात साल २०१६ साली कन्नड चित्रपट kirik party पासून केली होती. हा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List