कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे अमित शाह वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. शाह आजसुद्धा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शाह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत दादरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय काम करावं? याबाबतच्या सूचनांचा थेट लेखाजोखाच मांडला.

अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना काय-काय सूचना केल्या?

  1. महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल.
  2. १० टक्के मतदान वाढवा. सराकर आपले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील
  3. आपल्या विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल
  4. १० टक्के मतदान वाढवा. सरकार आपले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील.
  5. जे आपले मतदार नाही, त्या कुटुंबांना भाजपचे सदस्य करा. हारतुरे घालून निवडणूक जिंकता येत नाही. मतं वाढली तरच निवडणूक जिंकता येते. त्यासाठी मतं वाढवण्याचा प्रयत्न करा
  6. घराघरात वाद असतात, तसेच विधानसभेत असतात. त्यामुळे असे १० मतभेद असलेले दूर करा. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये असलेले मतभेद दूर करा.
  7. काही कामं कुणालाच करायची नसतात, पण खरा कार्यकर्ता तेच काम करायला घेतो. काम करताना वाद होतोच, पण तो वाद संपवता आला पाहिजे.
  8. ज्या संघटनेत मतभेद असतात, वेगवेगळ्या दिशेने काम करतात, ती संघटना कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला सर्वप्रथम निवडणूक पूर्वी हे मतभेद दूर करायचे आहेत

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा? मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर...
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला
सुंदर संतती प्राप्तीसाठी वहिनी दिरासोबत पळाली, पतीची पोलिसात धाव
दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश