Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का?

Coldplay कॉन्सर्टच्या तिकीटांवरुन Book My Show च्या सीईओवर मोठा आरोप, अटक होणार का?

तुम्ही कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकीट विकत घेण्याचा प्रयत्न केला का? बरेच प्रयत्न करुनही तुम्हाला तिकीट मिळू शकली नाही का? इतकच नाही, आता जी तिकीट उपलब्ध आहेत, त्याची किंमत खूपच जास्त आहे. या तिकीटाची ब्लॅक मार्केटिंग झाल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे. म्हणून त्यांनी ऑनलाइन तिकिटिंग प्लेटफॉर्म ‘बुक माय शो’ च्या CEO ना समन केलय.

‘बुक माय शो’ चा मालकी हक्क बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायवेटकडे आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे सीईओ आशीष हेमराजानी आणि एका सीनियर टीम मेंबरला बोलवलं आहे. त्यांच्यावर मुंबईत होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांची ब्लॅक मार्केटिंग केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना शनिवारी हजर होण्यास सांगितलय.

कोल्ड प्लेची टीम भारतात कधी येणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार वकील अमित व्यास यांनी मुंबई पोलिसात कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार झाल्याची तक्रार नोंदवली. यावर कारवाई करत मुंबई पोलिसांनी बुक माय शो च्या सीईओला समन पाठवलं आहे. इंटनॅशनल म्यूजिक बँड कोल्डप्ले पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात टूरवर येणार आहे. भारतात जवळपास आठ वर्षांनी या बँडची कॉन्सर्ट होत आहे. कोल्डप्लेचा कॉन्सर्ट 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी मुंबईत होणार आहे.

सगळे तिकीट्स काही मिनिटात ‘Sold Out’ कसे झाले?

हा कॉन्सर्ट ‘म्यूजिक ऑफ स्फीयर्स वर्ल्ड टूर’ चा हिस्सा आहे. बुक माय शो वर कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकीट विक्र 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरु झाली होती. पण काही सेकंदात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर काही वेळात कॉन्सर्टचे सगळे तिकीट्स ‘Sold Out’ झाले.

रि-सेलिंग वर भारतीय कायदा काय सांगतो?

कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीटाची ओरिजनल प्राइस 2500 ते 35,000 दरम्यान होती. पण काही सेकंदात सर्व तिकीट विकले गेले. त्यानंतर काही री-सेलर प्लेटफॉर्मवर हे तिकीट 35,000 ते 3 लाख रुपया दरम्यान विकले जात आहेत. या प्लेटफॉर्म्समध्ये Viagogo आणि Gigsberg सारखी नावं आहेत. काही मिनिटात सर्व तिकीट विकली गेल्याने त्याचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले. ‘बुक माय शो’ ने एक स्टेटमेंट जारी करुन री-सेलिंग प्लॅटफॉर्म Viagogo आणि Gigsberg शी काही देणंघेणं नसल्याच स्पष्ट केलं होतं. भारतीय कायद्यानुसार देशात कुठलाही चित्रपट किंवा शो च्या तिकीटांची मोठ्या प्रमाणात खरेदी त्यानंतर रि-सेलिंग दंडनीय गुन्हा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला
मुंबईतील ठाण्यात रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली. बांगलादेशी ही मॉडेल संपूर्ण परिवारासोबत घुसखोरी करुन पश्चिम बंगालमध्ये...
सिनेटचा विजय ही तर सुरुवात, विधानसभेला…; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार
‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’
अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…
लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…
ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…