सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर, धमाका आणि…

सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर, धमाका आणि…

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमात आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

शरद केळकर हा हिंदी मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा अभिनेता हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.

उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. विशेष म्हणजे हा चित्रपट  २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक समित कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. ह्या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’, शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक?; खेळीमागचं कारण काय? देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’, शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक?; खेळीमागचं कारण काय?
राज्य सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय...
मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, 30 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार?
अंकिता वालावलकर हिने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य, लोकांमध्ये संताप, थेट म्हणाली, त्यांच्या घरी…
Ind Vs Ban 2nd Test – टीम इंडियाने गाजवला चौथा दिवस; बांगलादेशच्या बत्त्या गुल, उद्याचा दिवस निर्णायक
आपल्याकडच्या रस्त्यांवरील खड्ड्यात मत्स्यपालन होऊ शकते, भाजप नेत्याला सरकारला घरचा आहेर
टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही…; दलित विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे IIT ला निर्देश
राहुल गांधी 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर