सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो! मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही!! उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो! मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही!! उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या आरतीला गेले होते. ठीक आहे. सरन्यायाधीशांना धन्यवाद! मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही!! सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्याय मागत आहोत. पण नुसत्या तारखांवर तारखा पडत आहेत. मोदी आरतीला का गेले याचे गूढ आता उकलत आहे. न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दोन महिन्यांनी आपले सरकार येणारच आहे, तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनही देणार असल्याचा शब्दही या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

कोपरगाव येथे आयोजित जुनी पेन्शन महाअधिवेशन आणि पैठण व वैजापूर येथील शिवसंवाद मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेले. त्यावरून देशभरात टीकेची झोड उठली. त्यावर भाजपने लगेच डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीचे आणि त्याला उपस्थित असलेल्या तत्कालीन सरन्यायाधीशांचे फोटो व्हायरल केले. त्यावर पलटवार करताना काँग्रेसने त्या इफ्तार पार्टीला उपस्थित असलेल्या लालकृष्ण आडवाणींचे फोटोही व्हायरल केले. सगळ्यांसमोर भेटणे वेगळे आणि एकटे घरी जाणे वेगळे! आमदार अपात्रतेच्या प्रकरणात तारखांवर तारखा का पडत आहेत, याचे गमक या भेटीत आहे का? नशीब, मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही! असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी हाणला.

भाजपला महाराष्ट्रावरचा भगवा पुसायचा आहे

महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच बोगसगिरी चालू आहे. बोगस जनता पार्टी! गोमुत्रधारी! महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा, साधूसंतांचा, विचारवंतांचा म्हणून ओळखला जातो. पण भाजपला ही ओळख पुसायची आहे. महाराष्ट्रावरचा भगवा त्यांना पुसायचा आहे. भाजपच्या या पुटील डावाला शिवसेना आडवी जातेय म्हणून त्यांना शिवसेना नको. त्यामुळेच राज्यात फोडाफोडीचे विष पेरले गेले, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

गेलेली सत्ता परत खेचून आणणार!

सत्ता येते आणि जाते, शिवसेनेला सत्तेची चिंता नाही. जनतेच्या आयुष्याची आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबीयाची चिंता आहे. सत्ता पुन्हा खेचून आणून सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. ‘मिंधे सरकार गेल्यात जमा आहे. त्यांना पेन्शन कसली, टेन्शन देण्याची वेळ आली आहे. पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नका. सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत अशा आंदोलनाचा निर्धार करा आणि आंदोलनाची ‘मशाल’ पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता निवृत्तीनंतरचीच तारीख द्या

पंतप्रधान सरन्यायाधीशांकडे आरतीला काय जातात, शिवसेनेच्या खटल्यात तारखांवर तारखा पडतात, काय चाललेय हे, असा संतप्त सवाल करून उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांनी आता निवृत्तीनंतरचीच तारीख द्यावी म्हणजे तेही मोकळे आणि अम्हीही मोकळे असा टोला लगावला. लोकमान्य टिळक ब्रिटिशांना म्हणाले होते, तुमच्यापेक्षा जनतेचे न्यायालय मोठे आहे. मीदेखील आता जनतेच्या न्यायालयात आलो आहे, जनतेकडे न्याय मागतो आहे. तुम्ही मला न्याय देणार का? सर्वोच्च न्यायालयाबद्दल आम्हाला आदर आहे. पण विलंबाने न्याय देणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच आहे, असे खडे बोल या वेळी उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

…तर मोदींना 90 हजार पेन्शन मिळेल सुभाष देसाईंनी दिला सगळा हिशेब

‘दोन कुबड्या घेण्याऐवजी पंतप्रधान मोदी घरी बसले असते, तर त्यांना बेसिक पेन्शन 45 हजार व महागाईभत्ता 45 हजार अशी 90 हजारांची पेन्शन सुरू झाली असती, असे सांगत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी हिशेबच मांडला. एकदा खासदार झाल्यावर 25 हजार रुपयांची पेन्शन लागू होते. दुसऱ्यांदा खासदार झाल्यावर त्यात 10 हजार रुपये वाढवले जातात. तिसऱ्यांदा खासदार झाल्यावर त्यात अजून 10 हजारांची भर पडते, असे देसाई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच ‘या’ अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत.. गोविंदाने थेट केले पत्नीसमोरच ‘या’ अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, पुढे जे घडले ते अत्यंत..
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवलाय. गोविंदाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गोविंदा याने त्याच्या आतापर्यंतच्या...
जन्मावेळी बाळाचं वजन किती हवं ? वजन कमी असल्याचे काय तोटे ?
घाटकोपर येथे बेस्टच्या बसला आग, वाहक जखमी
अटल सेतूवर कार उभी केली, मग तरुणाने समुद्रात उडी घेतली
कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या लेट लतिफांना समज देणार
लडाखजवळ चिनी सैन्याकडून क्षेपणास्त्र चाचणी, हिंदुस्थानची चिंता वाढली!
Ind Vs Ban 2nd Test Match – पावसाने विश्रांती घेताच विराट बरसला! सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत