हेरिटेज ‘ट्राम’मध्ये बाप्पा विराजमान, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी साकारला देखावा

हेरिटेज ‘ट्राम’मध्ये बाप्पा विराजमान, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी साकारला देखावा

घाटकोपर येथे राहणाऱ्या राहुल गोकुल वारिया यांनी या वर्षी गणेशोत्सवात मुंबईच्या जुन्या ट्रामची प्रतिकृती आपल्या घरी तयार केली आहे. ही अनोखी सजावट पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. राहुल वारिया व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट असून जाहिरात क्षेत्रात आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतो. दरवर्षी तो गणपतीसाठी अनोखी सजावट करतो. खासकरून मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची साधने ही त्याची थीम असते. मग डबल डेकर बस असेल किंवा मेट्रो… या वर्षी राहुलने एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रामची प्रतिकृती साकारली आहे.

ट्राम ज्या मार्गावरून धावत होती त्या मार्गावरील रॉक्सी सिनेमा, रिगल सिनेमा अशी आजूबाजूची दृश्येही बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला ट्राम घोड्यांद्वारे चालवल्या जात होत्या. नंतर मे 1907 मध्ये मुंबई इलेक्ट्रिक ट्राम सुरू करण्यात आल्या. ट्राम सर्व्हिस इतकी यशस्वी झाली की, सप्टेंबर 1920 मध्ये डबल डेकर इलेक्ट्रिक ट्राम सुरू करण्यात आल्या.

90 वर्षे सेवा दिल्यानंतर शेवटची ट्राम 31 मार्च 1964 साली धावली आणि ट्राम सर्व्हिस बंद झाली. गणेशोत्सवात राहुल यांनी तो काळ पुन्हा जागवला आहे. ट्रामचा संकल्पना देखावा चार फूट बाय चार फूट उभारण्यात आला आहे. यामध्ये राहुलला त्याचे कुटुंबीय आणि मित्र मौलिक रावल यांनी मदत केली.

आम्ही मुंबईत राहतो, खूप प्रवास करतो. पण आज आपल्याला इथल्या हेरिटेज ट्रामचा आता विसर पडला आहे. पुढच्या पिढीला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुंबईत सुरुवातीला घोडागाडी चालवल्या जात होत्या, त्यानंतर या ट्राम आल्या. मुंबईच्या पहिल्या परिवहन सेवेची लोकांना जाणीव करून देण्याची माझी इच्छा आहे, म्हणूनच मी या प्रकल्पाचे नाव ‘ मिसिंग ट्राम’ असे ठेवल्याचे राहुल वारिया याने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला बांगलादेशी बन्ना शेख मुंबईत येऊन बनली रिया बर्डे, अडल्ट चित्रपटात काम… पोर्न स्टारने पूर्ण परिवाराचा आधार कार्ड, पासपोर्ट अन् वोटर आयडीही बनवला
मुंबईतील ठाण्यात रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली. बांगलादेशी ही मॉडेल संपूर्ण परिवारासोबत घुसखोरी करुन पश्चिम बंगालमध्ये...
सिनेटचा विजय ही तर सुरुवात, विधानसभेला…; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Senate Election : हा दस का दम… आदित्य ठाकरे यांनी विजयी होताच भरला हुंकार
‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’
अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…
लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…
ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…