जन्मताच 775 कोटींची मालक बनली ही चिमुकली, वडिलांपेक्षा आईकडे दुप्पट संपत्ती

जन्मताच 775 कोटींची मालक बनली ही चिमुकली, वडिलांपेक्षा आईकडे दुप्पट संपत्ती

Deepika Padukone and Ranveer Singh Net Worth: बॉलीवूडमधील स्टार कलाकार दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरात नन्ही परी आली आहे. दोघे त्या परीचे आई-बाप बनले आहे. दीपिकाने शनिवारी मुलीला जन्म दिला. मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शनिवारी दीपिकाने कन्यारत्नास जन्म दिला. त्यापूर्वी दीपिकाने परिवारासह 6 सप्टेंबर रोजी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. आता दीपिका आणि रणवीर आई-बाबा बनले. या पॉवरफूल कपलकडे कोट्यवधींची नेटवर्थ आहे. अनेक लग्झरी फ्लॅट्स, आलीशान बंगले आणि गाड्या आहेत. आता त्यांची नन्ही परी या संपत्तीची उत्तराधिकारी बनली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह बॉलीवूडमधील टॉप स्टार्स आहे. त्यांनी चित्रपट, जाहिरातीमधून कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. कमाईच्या बाबतीत हे कपल एकमेकांना जोरदार टक्कर देत आहे. त्या दोघांची मिळून ज्वाइंट नेटवर्थ 745 कोटी रुपये आहे.

रणवीरकडे किती आहे संपत्ती?

14 वर्षांपूर्वी असिस्टेंड डायरेक्टर म्हणून रणवीरने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर रणवीरने एकामागे एक सुपरहिट चित्रपट दिले आहे. चित्रपटात येण्यापूर्वी कटेंट रायटर म्हणून रणवीरने काम केले. त्यावेळी पगार हजारो रुपयांमध्येच होता. परंतु आता एका चित्रपटासाठी कोट्यावधीचे मानधन ते घेतात. आपल्या युनिक स्टाइल आणि फॅशनमुळे रणवीर चर्चेत राहिला. तो जाहिरातीमधून चांगला पैसा कमवतो. त्याच्याजवळ पेप्सी, चिंग्स, मान्यवर, बिंगो या सारख्या ब्रँड आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये आहे.

दीपिकाकडे किती आहे संपत्ती?

दीपिका पदुकोणची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये होते. दीपिका चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते. तसेच अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक तिने केली आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिकाची एका महिन्याची कमाई तीन कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिका एका एंडोर्समेंटसाठी 8 कोटी रुपये घेते. तिच्याकडे Levi’s, Dyson, Asian Paints, Jio या सारखे मोठे ब्रँड्स आहेत. दीपिकाने अनेक सौंदर्य आणि फॅशन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. म्हणजेच या दोघांची ज्वाइंट नेटवर्थ 745 कोटी रुपये आहे. आता त्यांची चिमुकली या संपत्तीची उत्तराधिकारी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि… मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि…
'सविता भाभी'चे पात्र साकारणारी अभिनेत्री रोजलिन खान हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केली. मात्र, तिच्या...
मी माझ्या बापाचंही ऐकत नाही…बहिणीच्या पॉडकॉस्टवरच भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; ते घडलं अन्…
मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला – प्रा. हाके
आता चर्चा नको, अंमलबजावणी हवी; मनोज जरांगे पाटील यांची ठोस भूमिका
मुंबईत आणखी एक हिट अँड रन, 49 वर्षीय महिलेचा मृत्यू
अंबाजोगाईजवळ भीषण अपघात; चाकूरचे चार जण जागीच ठार
Shirdi News – साईबाबांच्या चरणी 11 तोळ्यांचा सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण