‘क्लीन चिट’ घोटाळा करणाऱ्या भाजपने मनमोहन सिंह यांची जाहीर माफी मागावी! – संजय राऊत

‘क्लीन चिट’ घोटाळा करणाऱ्या भाजपने मनमोहन सिंह यांची जाहीर माफी मागावी! – संजय राऊत

सीबीआयने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध एअर इंडिया लीजिंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेलांनी भाजपशी सलगी केल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी विमान वाहतूक मंत्री होते. त्यावेळी एअर इंडियासाठी केलेल्या विमान खरेदीत अनियमितता आढळली होती आणि या प्रकरणाचा भंडाफोड होताच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. भाजपने या मुद्द्यावरून देशभरात प्रचंड गदारोळ घातला होता. आता भाजपच्याच सरकारने त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी मनमोहन सिंह यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.

हे वाचा – सीबीआयची ‘क्लीन चिट’ मिळाली, प्रफुल्ल पटेलांना आता ‘मिर्ची’ही गोड लागेल; रोहित पवारांचा टोला

ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडियामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला म्हणून भाजपने राडा घातला होता. मनमोहन सिंह सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला होता आणि आता त्यांच्याच सरकारने त्यांना क्लीन चिट दिली आहे. आता इक्बाल मिर्ची, हसन मुश्रीफ यांनाही क्लीन चिट मिळेल. भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये टाकून हा क्लीन चिटचा घोटाळा सुरू आहे. त्यामुळे यूपीए काळातील भ्रष्टाचारावरून गदारोळ घालणाऱ्या भाजपने जाहीरपणे माफी मागावी.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

काय होते प्रकरण?

यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी केलेल्या विमान खरेदीत अनियमितता आढळली. या प्रकरणाचा भंडाफोड होताच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ने करण्याचे आदेश दिले होते. यानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासोबत सलगी केल्याने त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध एअर इंडिया लीजिंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली… ‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली…
अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे....
श्रीराम यांच्या वेशात रणबीर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी; ‘रामायण’च्या सेटवरील फोटो लीक
एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?
मेकअप रुम बंद केल्यानंतर… ‘ये हैं मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मराठी गाणं जगात गाजवलं; ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर
तारक मेहताच्या ‘सोढी’च्या अपहरणाचे गूढ ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे वाढले, मुंबई नव्हे तर..
घटस्फोटानंतर दुसरे लग्न न करता ‘या’ अभिनेत्री जगत आहेत एकट्या आयुष्य, करिश्मापासून ते..