ना मिंधे, ना भाजपचा नेता, अजित पवार गटाच्या प्रचारापासून मोदी, शहा दूर!

ना मिंधे, ना भाजपचा नेता, अजित पवार गटाच्या प्रचारापासून मोदी, शहा दूर!

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. त्यात मोदी, शहा तर दूरच, भाजपच्या एकही नेत्याचा समावेश नाही. अगदी मिंधे गटाचे सरदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव नाही. यामुळे प्रचारात अजित पवार गटाला एकटे पाडले जाणार की काय असेही चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटानंतर अजित पवार गटानेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी ही 37 जणांची यादी जाहीर केली. भाजप आणि मिंधे गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पेंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपाबरोबर महायुतीत असलेल्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये मात्र मोदी, शहा किंवा एकही पेंद्रीय मंत्री नाही. अगदी राज्यातील भाजपचे मंत्रीही नाहीत.

मोदी आणि शहांनी जाणीवपूर्वकच अजित पवार गटाच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटण्यापूर्वी काही दिवस आधीच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. पंतप्रधानांनीच इतका गंभीर आरोप केल्याने आता तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागणार या भीतीने अजित पवारांनी राष्ट्रवादीतून 40 आमदार घेऊन महायुतीत प्रवेश केला. आता त्याच अजित पवार गटासाठी मते मागितली तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा फटका निवडणुकीत बसेल या शक्यतेनेच मोदी, शहांसह भाजपचे नेते अजित पवार गटापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. असे असले तर मग अजित पवारांचा समावेश भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये का केला गेला, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच नावाची चर्चा सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच नावाची चर्चा
राज्यात चौथ्या टप्यात होत असलेल्या लक्षवेधी लढतीमध्ये शिरूर लोकसभा मंतदारसंघांचा क्रमांक वरचा लागतो. या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे...
‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली…
श्रीराम यांच्या वेशात रणबीर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी; ‘रामायण’च्या सेटवरील फोटो लीक
एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?
मेकअप रुम बंद केल्यानंतर… ‘ये हैं मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मराठी गाणं जगात गाजवलं; ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर
तारक मेहताच्या ‘सोढी’च्या अपहरणाचे गूढ ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे वाढले, मुंबई नव्हे तर..