रामटेकमधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

रामटेकमधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण, काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. कारण बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असल्याने रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

रश्मी बर्वे यांनी 2020 वडिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र बनवले होते. मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र बनवताना देण्यात आलेले वडिलांचे शैक्षणिक कागदपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. राज्य सरकारने 22 मार्चला याप्रकरणी आदेश काढत चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी जिल्हा जात पडताळणी समितीचे अधिकारी गेल्या तीन-चार दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर गुरुवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांच्या घरावर एक नोटीस चिटकवली आणि 10 वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानंतरही रश्मी बर्वे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय घेत रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले होते.

रश्मी बर्वे यांच्याऐवजी आता श्यामकुमार बर्वे हे आता या जागेवर उमेदवार असतील असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनिमॉल, मोहिते ट्रायथ्लॉन विजेते सिनिमॉल, मोहिते ट्रायथ्लॉन विजेते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुरूषांच्या विभागात मुरलीधरण सिनिमॉलने 01.02.03 असा कालावधी नोंदवित पहिले स्थान पटकाविले. पुरूषांच्या विभागात कौशिक मालंदेकरने दुसरे स्थान...
मिंधेंच्या पायाखालची जमीन सरकली, शिवसैनिकांवर दबावतंत्र; एम.के. मढवी यांना ठाणे पोलिसांकडून अटक
पत्ता कापताच पूनम महाजन यांचं ट्विट; म्हणाल्या, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण…
संविधान बदलणार म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडेल; रामदास आठवले यांचा भरसभेतून दम
मोदीजी,दहा वर्ष सेवा केलात आता तरी आमचा जीव सोडा, मार्कंडेय काटजू यांचा खोचक टोला
एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांबाबत आता अमेरिकाही सतर्क; मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय
गुगल, यूट्युबच्या जाहिरातींवर भाजपने उधळले 102 कोटी रुपये! सर्वाधिक खर्च कर्नाटक विधानसभेवर