Mumbai Hospital Fire: मुंबईच्या WINS रुग्णालयात आग, चार जण जखमी

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या WINS रुग्णालयात आग, चार जण जखमी

मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरातील WINS रुग्णालयामध्ये आग लागली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने बोरिवलीच्या न्यू विन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तेथील परिस्थिती आटोक्यात आणली असून आगही विझवण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

WINS रुग्णालयाला शविवारी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान आग लागली होती. ही आग रुग्णालयाच्या मागील भागात असलेल्या सेंट्रल एअर कंडिशनिंग युनिटच्या इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन आणि कॉम्प्रेसरपर्यंत पसरली होती. घटनेची माहिती मिळाताच , 108 रुग्णवाहिका सेवा, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यामळे दुपारी दोनच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

न्यू विन्स रुग्णालयाच्या डॉ. तृप्ती यांनी या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती दिली. नील (35), राजदेव (35), नरेंद्र मुर्या (45), स्वाधीन मुखी (56) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…