आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हेतू सिद्ध करायला हवा

आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हेतू सिद्ध करायला हवा

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱयाचा हेतू सिद्ध होणे आवश्यक आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने पत्नीच्या आत्महत्ये प्रकरणी पती व सासू-सासऱयांच्या विरोधातील गुन्हा रद्द केला. पीडितेच्या भावाने तिचा पती, सासू-सासरे व अन्य नातलगांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. कौटुंबिक हिंसाचार व मारहाणीचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका केली होती. न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने या सर्वांचा गुन्हा रद्द केला.

पीडितेने विवाहानंतर 16 वर्षांनी आत्महत्या केली. पतीचे जे नातलग सोबत राहत नव्हते त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. आरोपींमध्ये 84 वर्षीय आजींचाही समावेश आहे. या सर्व आरोपींनी पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा एकही पुरावा सादर झालेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. घटनेच्या दिवशी पती व त्याच्या वडिलांमध्ये भांडण सुरू होते. त्या वेळी पीडिता घरातून कधी निघून गेली हे कोणालाच कळले नाही. नंतर तिचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यामुळे पती व सासरच्यांनी पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केले असावे हे प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाचे निरीक्षण

एखाद्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्यास त्यामागचा त्याचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे. आत्महत्या करणाऱयाला घटने वेळी काय वाटत होते, यापेक्षा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱयाचा हेतू काय होता हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

आत्महत्येने सार्वजनिक शांतता कशी भंग होईल?

पीडितेच्या आत्महत्येने सार्वजनिक शांतता कशी भंग होईल, असा सवाल न्यायालायने उपस्थित केला. एखाद्याने भडकाऊ विधान केल्यास सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो. आत्महत्येने कसा होईल. पीडितेच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. मारहाण करायला दोन माणसे लागतात. या प्रकरणात पीडितेने विहिरीत उडी घेतली आहे. येथे मारहाणीचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. पीडितेला त्रास दिल्याने मालमत्ता किंवा अन्य काही तरी मिळू शकेल हा आरोपींचा उद्देश असेल तर काwटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. याचिकाकर्त्यांचा तसा काही हेतू असल्याचे स्पष्ट होत नाही, असे न्यायालायने नमूद केले.

काय आहे प्रकरण

n पीडितेने 20 फेब्रुवारी 2020 रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. स्त्राrधन न दिल्याने पती व सासरचे तिचा छळ करत होते. तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा पीडितेच्या भावाचा आरोप होता. त्यानुसार 25 फेब्रवारी 2020 रोजी गुह्याची नोंद करण्यात आली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती.

पती सासरच्यांचा दावा

n पीडितेचा छळ सुरू होता याचा ठोस पुरावा नाही. पीडितेने आत्महत्या केली असावी किंवा तिची कोणीतरी हत्या केली असावी, असा तिच्या भावाचा आरोप आहे. आम्ही तिला आत्महत्येस प्रवृत्त केले नसल्याचा दावा पती व सासरच्यांनी केला.

पोलिसांची मागणी

n आरोपींविरोधात सबळ पुरावे आहेत. न्यायालयाने त्यांचा गुन्हा रद्द करू नये. आरोपींविरोधात खटला चालवणे आवश्यक आहे. आरोपींची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली… ‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली…
अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे....
श्रीराम यांच्या वेशात रणबीर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी; ‘रामायण’च्या सेटवरील फोटो लीक
एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?
मेकअप रुम बंद केल्यानंतर… ‘ये हैं मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मराठी गाणं जगात गाजवलं; ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर
तारक मेहताच्या ‘सोढी’च्या अपहरणाचे गूढ ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे वाढले, मुंबई नव्हे तर..
घटस्फोटानंतर दुसरे लग्न न करता ‘या’ अभिनेत्री जगत आहेत एकट्या आयुष्य, करिश्मापासून ते..