कार थांबवली, नंतर अटल सेतूवरून उडी मारली; अलिबागच्या शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल
प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईच्या समुद्रात उभारण्यात आलेल्या अटल सेतूवरून उडी घेत जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. शुक्रवारीही अलिबाग येथील एका 50 वर्षीय शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेतली. वैभव इंगळे असे या शिक्षकाचे नाव असून पोलिसांकडून समुद्रात त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी नक्की कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव इंगळे हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रविवासी होते. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ते कारमधून अटल सेतूवरून जात होते. यादरम्यान त्यांनी कार थांबवली आणि थेट अटल सेतूवरून खाली उडी घेतली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून इंगळे यांचा शोध सुरू आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List