‘व्हॅलेन्टाईन डे’ला जालन्यात थरार; प्रेयसीचा खून, मृतदेह घरात पुरला, पोलिसांनी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या

‘व्हॅलेन्टाईन डे’ला जालन्यात थरार; प्रेयसीचा खून, मृतदेह घरात पुरला, पोलिसांनी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या

जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ (वय – 30) ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. पतीपासून विभक्त राहणारी मोनिका निर्मळ ही जालना येथे माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगर अप-डाऊन करीत होती.

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका – ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही व तिचा मोबाईलही लागत नव्हता, त्यामुळे चिंतातुर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन – दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून, मी लग्न – केले असून, तुम्हाला एक वर्षानी भेटायला येईल, अशा आशयाचा मेसेज आला.

पोलीस अधीक्षक बन्सल यांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच – पोलिसांची तपासचक्रे गतीने फिरली. कदीम जालना पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासूर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली होती, मात्र त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते.

पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉलडिटेल्सबरोबरच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढले होते. मोनिका हिच्यासोबतचे तासन्तास केलेले मोबाईल संभाषण आणि 6 फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास काल ताब्यात घेत, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने पोपटासारखे तोंड उघडले.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनपासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर उभी करीत असे. त्यादरम्यान, मोनिका हिचे वाहनतळावर काम करणाऱ्या शेख इरफान शेख पाशा (वय – 35) नामक नराधमासोबत प्रेमसंबंध जुळले होते. इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही 6 फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती.

लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता. शेतात असलेल्या पडीत घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून, त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी कदीम जालना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले आहे.

कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस अंमलदार नंदकुमार ठाकूर, दिलीप गायकवाड, शेख अन्सारी आदींनी शिलेगाव पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी...
‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
PVR थिएटरकडून प्रेक्षकाला लाख रुपयांची भरपाई; कारण वाचून व्हाल थक्क!
महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण
पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ