फक्त 25 हजारांच्या अटकपूर्व जामिनावर वामन म्हात्रे मोकाट; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून मीडियासमोर चमकोगिरी

फक्त 25 हजारांच्या अटकपूर्व जामिनावर वामन म्हात्रे मोकाट; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून मीडियासमोर चमकोगिरी

बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने अश्लील आणि अर्वाच्च भाषेत वर्तन केले होते. त्याच्या मुजोरीविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी सत्तेपुढे झुकत त्याला हात लावला नव्हता. याचा फायदा घेत म्हात्रे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. कल्याण कोर्टाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे अवघ्या 25 हजारांच्या अटकपूर्व जामिनावर वामन म्हात्रे शहरात मोकाट फिरत आहे. मीडियाशी बोलायचे नाही. साक्षीदार, फिर्यादी यांच्यावर दबाव टाकायचा नाही, अशी न्यायालयाने सक्त ताकीद दिली असतानाही वामन म्हात्रे मीडियाला बाईट देत चमकोगिरी करत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊनही पोलीस मात्र चिडीचूप असल्याने शहरवासीय संताप व्यक्त करत आहेत.

न्यायालयाने जामीन देताना म्हात्रे याला फिर्यादीबाबत मीडियात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही, पुरावे नष्ट करायचे नाही, अशी अट घातली आहे. तरीही न्यायालयातून बाहेर पडताच म्हात्रे याने मीडियासमोर चमकोगिरी करत आपले काही चुकलेच नाही, असा आव आणणाऱ्या बाईट दिल्या. याशिवाय फिर्यादी आणि साक्षीदारांवर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचे काम बदलापुरात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल पोलिसांनी ठोस भूमिका घेऊन म्हात्रेवर कारवाई करण्याची गरज असतानाही ते चिडीचूप आहेत. सत्तेच्या दबावापुढे पोलीस झुकत असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिसांवर राजकीय दबाव

बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर 20 ऑगस्ट रोजी नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन करत आठ तास रेल रोको केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार मोहिनी जाधव यांना वामन म्हात्रे याने, ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, अशी हेटाळणी केली होती. चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणाऱ्या वामन म्हात्रेविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली. मात्र त्याला वाचवण्यासाठी मिंधे गटाने सत्तेचा गैरवापर केला. अखेर नागरिकांच्या रेट्यापुढे पोलिसांना झुकावे लागले आणि म्हात्रेविरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागला. गुन्हा दाखल होताच म्हात्रेची पळापळ सुरू झाली.

तत्काळ जामीन मिळाल्याचे आश्चर्य

अॅट्रॉसिटी आणि विनयभंग या गुन्ह्यात सहजासहजी जामीन मिळत नाही. मात्र म्हात्रेला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. एरवी न्यायालयात कित्येक महिने अशा केसेसवर सुनावणी तर लांब, पण केस बोर्डावरही येत नसताना वामन म्हात्रेला तत्काळ जामीन मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार महेश कामत यांनी आश्चर्य व्यक्त केले. महिला पत्रकाराला अवमानकारक वागणूक देणारा आरोपी जामिनावर शहरात मोकाट फिरत असल्याबद्दल त्यांनी चीड व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांच्या ‘जनसन्मान’विरोधात बंद अजितदादांच्या ‘जनसन्मान’विरोधात बंद
अनगर अपर तहसील कार्यालय मंजूर केल्यानंतर उद्भवलेल्या संतप्त जनभावनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जनसन्मान यात्रे’चा मोहोळ तालुक्यातील जनतेने कडकडीत...
अभिनेत्रीच्या घडय़ाळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक 
भाजपचे गलिच्छ राजकारण संघाला मान्य आहे का?, केजरीवाल यांनी सरसंघचालकांना विचारले पाच बोचरे प्रश्न
विज्ञान-रंजन – ध्वनीपाषाण!
तुरुंगात असताना मुलाची फी भरायला लोकांकडे भीक मागावी लागली
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
दिल्ली डायरी – बिहारमध्ये नितीशबाबूंची चलबिचल