उद्योग नेले, उद्या ‘लालबागचा राजा’ही पळवून नेतील! संजय राऊत यांची अमित शहांवर टीका

उद्योग नेले, उद्या ‘लालबागचा राजा’ही पळवून नेतील! संजय राऊत यांची अमित शहांवर टीका

केंद्रीय मंत्री मुंबई लुटण्याकरिता मुंबईत येत असतात. गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता मुंबईत आलेत. मुंबईतील अनेक उद्योग पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या, त्याप्रमाणे ते लालबागचा राजा तर गुजरातला नेणार नाहीत ना…अशी मला भीती वाटतेय, अशी मिश्कील टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केली.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर ते म्हणाले की, ‘‘लालबागच्या राजाचे मोठे नाव आहे. देशभरातून लोक येत असतात. चला, गुजरातला घेऊन जाऊ या, असे होऊ शकते. लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव शहा ठेवतील. ते व्यापारी लोक आहेत. ते महाराष्ट्राला शत्रू मानत आहेत. भाजपच्या अनेक लोकांना मुंबई लुटायची आहे’’, असे संजय राऊत म्हणाले.

अमित शहा कमजोर गृहमंत्री 

‘‘अमित शहांना शिवसेनेचा विरोध यासाठीच आहे की, महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार आणि अनेक महत्त्वाचे आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अमित शहांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. अमित शहा गृहमंत्री असले तरीही ते कमजोर गृहमंत्री आहेत’’, असेही संजय राऊत म्हणाले.

शहांना महाराष्ट्र विकलांग करायचाय

महाराष्ट्र आणि देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्मू-कश्मीर, मणिपूरमध्ये अमित शहांचे लक्ष नाही. राजकारण, पक्षपह्डी, लुटमार यांना पाठिंबा देणे, मुंबई लुटणे आणि लुटणाऱ्याला पाठिंबा देणे अशी कामे त्यांच्याकडून केली जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे स्वाभिमानी पक्ष पह्डून त्यांनी महाराष्ट्राची तोडपह्ड केली. महाराष्ट्र विकलांग करायचा हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते’’, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

पवारांच्या डोक्यात काय चाललेय हे फडणवीसांना शंभर वर्षे कळणार नाही 

शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे आहेत आणि ती मला माहीत आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर देवेंद्र फडणवीसांना कळले असते तर त्यांची ही अवस्था नसती, असे संजय राऊत म्हणाले.  पवारांच्या डोक्यात काय चाललेय हे फडणवीसांना शंभर वर्षे कळणार नाही. 2019 मध्ये पवारांच्या डोक्यात काय होतं हे त्यांना कळले नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता हिंमत असेल तर 2024 ला वेळेत निवडणुका घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतेय हे समजेल. तेव्हा फडणवीस यांचा मेंदू काम करायचे बंद होईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि… मोठ्या आर्थिक संकटात ‘सविता भाभी’, उरल्या सुरल्या महागड्या वस्तूंचीही चोरी, हैराण करणारा खुलासा आणि…
'सविता भाभी'चे पात्र साकारणारी अभिनेत्री रोजलिन खान हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात केली. मात्र, तिच्या...
मी माझ्या बापाचंही ऐकत नाही…बहिणीच्या पॉडकॉस्टवरच भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; ते घडलं अन्…
मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला – प्रा. हाके
आता चर्चा नको, अंमलबजावणी हवी; मनोज जरांगे पाटील यांची ठोस भूमिका
मुंबईत आणखी एक हिट अँड रन, 49 वर्षीय महिलेचा मृत्यू
अंबाजोगाईजवळ भीषण अपघात; चाकूरचे चार जण जागीच ठार
Shirdi News – साईबाबांच्या चरणी 11 तोळ्यांचा सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण