नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील

नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली : आढळराव पाटील

नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील

महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेड, गव्हाणे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसरी : महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेड, गव्हाणे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, नमो संवाद संकल्पना ही गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण योजना राबवली गेल्या याचा ऊहापोह मांडण्यासाठी सुरू केला आहे. आणि या उपक्रमाला जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षात केलेली कामे दमदार ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळून काम करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान मी अनुभवलं २०१४ अगोदरचा आपला देश आणि त्यानंतरचा आपला देश यात फार फरक आता आपल्याला दिसत आहे.

३७० कलम हटविण्याचा निर्णय असेल, तितका धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच नेत्यांमध्ये नसेल. आत्ताच्या योजना हे जनतेमधील सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारे आहेत. थेट नळाच्या माध्यमातून १३ लाख ३८ हजार घरांमध्ये पाणी पोहोचवलं आहे. मोदीजींना अमलात आणलेल्या पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पैसे जातात, पुढील पाच वर्षातही या योजना लागू राहणार आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
 
प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुगे, शिवसेना उपनेतेे इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, नगरसेवक अंकुश मळेकर, नगरसेवक संतोष मोरे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, भाजप उपाध्यक्ष किसन बावकर, भाजप महिला पिंपरी चिंचवड सरचिटणीस सोनम मोरे, समाजसेवक अंकुश मळेकर, युवा नेते विनायक मोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी