लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – शरद पवार

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – शरद पवार

आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंचकावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार अशी भाषणाला सुरुवात करतील. दिल्लीत सांगतात की शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत केली. बारामतीत येऊन म्हणतात बोट धरून आलो, असं सांगतात आणि ८ महिन्यात निवडणुकीमध्ये वेगळं भाषण करतात. भाषणात सातत्य असलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही असेही शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुरंदरमधील लोकांनी नेहमी साथ देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या का? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. ४०० पार करण्याचा अर्थ असा आहे त्यांना वाटेल ते त्यांना करायच आहे. त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदींची धोरण काय आहेत यातून कळते, त्यामुळे अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू. नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आपली खून आहे. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आपली आहे. बांगलादेश सारखा देश आपल्यापेक्षा पुढे आहे. अशोक चव्हाण यंच्यावर आरोप केलं ते भाजपसोबत गेले. भोपाळमध्ये भाषण केले बँक आणि इरिगेशन मध्ये घोटाळा केला असा आरोप केला. ज्यांच्यावर आरोप केले ते आज कुठं आहेत? झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं असेही शरद पवार म्हणाले.

निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक अनेक विषयांवरती चर्चा करत आहेत. दुष्काळाचा विषय गंभीर बनला असून लोक त्याबाबत देखील बोलत आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. अनेक विषयांवर चर्चा होत आहे. लोक उत्सुक आहेत लोक दुष्काळावर देखील बोलत आहेत. या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह असून हे चिन्ह सर्वदूर पोचवण्याचं काम लोक स्वतःच करत आहेत अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुरंदरचे अंजीर जर्मनीत जाता त्यामुळे टॅक्स कमी झाला पाहिजे. जर तसाच चालू राहिला तर सरकारला सांगू जा काय करायचं ते करा आम्ही टॅक्स भरत नाही. चाकणला विमानतळ झालं नाही म्हणून मी विमानतळ इकडे आणल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. आम्ही जमीन घेतली नाही, तिथं जमीन कुणी घेतली हे मला माहित नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता? माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात...
प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी
‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी बनली ‘हिरामंडी’ची आलमजेब; नेटकरी म्हणाले ‘भन्साळींनी हिलाच निवडलं..’
‘त्या’ दिवशी फार घालमेल झाली…; शिवा मालिकेत ‘सिताई’ साकारणाऱ्या अभिनेत्रीला अश्रू अनावर
देशभरातील हवा बदलली, 4 जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार – शशी थरुर
निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे जुगारावर धाड; 60 पेक्षा जास्तजण ताब्यात, मुद्देमाल जप्त
अप्पू अन् दगडू पहिल्यांदाच एकत्र; प्रथमेश-ज्ञानदाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला