संगमनेरात पोलिसांची नाकाबंदी, कारवाईचा खाक्या; 64 वाहनांवर कारवाई, 15 रिक्षा जप्त

संगमनेरात पोलिसांची नाकाबंदी, कारवाईचा खाक्या; 64 वाहनांवर कारवाई, 15 रिक्षा जप्त

संगमनेर शहरात गेल्या महिनाभरापासून विविध घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमध्ये पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौजफाटय़ासह पोलिसी कारवाईचा खाक्या सुरू केला असून, त्यांच्या मदतीला आरटीओ विभागसुद्धा धावून आला आहे. त्यामुळे आता संगमनेरात अवैध उद्योग करणाऱयांची खैर नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे.

संगमनेर शहरात पोलीस विभागाकडून मंगळवारी सकाळपासून पायी पेट्रोलिंग, नाकाबंदीदरम्यान कारवाया करण्यात आल्या. आरटीओ विभागानेही अवैध वाहनांवर कारवाया केल्या. दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बसस्थानक अशा तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये 64 वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या. याशिवाय संगमनेर शहरातील जुना महामार्ग, मुख्य बाजारपेठ या भागामध्ये ज्या दुकानदारांनी दुकानाच्या पुढील भागात अतिक्रमण केलेले आढळून आले, तेथेही कारवाई करण्यात आली. त्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. एकूण 35 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, या सर्व कारवायांचे प्रस्ताव न्यायालयामध्ये पाठविण्यात आले आहेत.

संगमनेर शहर पोलीस विभाग आणि आरटीओ यांच्या संयुक्त पथकाने कागदपत्रे नसणाऱया रिक्षांवरदेखील कारवाई केली. यामध्ये कागदपत्रे नसणाऱया 15 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, अन्य 21 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ग्रामीण भागातील नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये जोर्वे, सुकेवाडी, निळवंडे, पिंपरणे, कनोली, वडगाव पान, कोल्हेवाडी इत्यादी भागांत विनापरवाना रिक्षा व वाहने फिरत असतात, त्यावर आरटीओमार्फत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच संगमनेर शहर व परिसरात अशा विनापरवाना रिक्षा या अवैध वाळू वाहतूक, गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जातात, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आठवडय़ातून किमान एकदा तरी आरटीओ विभागाच्या पथकाकडून संगमनेर शहरात विशेषतः बसस्थानक ते ज्ञानमाता विद्यालय, तीन बत्ती चौक ते रायतेवाडी फाटा, कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड, जमजम कॉलनी, भारतनगर, रहेमतनगर, मदिनानगर इत्यादी भागांत कारवाई करावी आणि या कारवाईकरिता मदतीला आवश्यक ते मनुष्यबळ हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे पत्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांना दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट; त्या आरोपींना मोक्का; ‘या’ गँगस्टरच्या अडचणीत वाढ सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट; त्या आरोपींना मोक्का; ‘या’ गँगस्टरच्या अडचणीत वाढ
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिल 2024 च्या पहाटे गोळीबार झाला. यावेळी सलमान खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत...
माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं विधान; उद्या काँग्रेस आणि वंचित…
IPL 2024 : 22 वर्षांच्या पोराने मुंबईला झुंजवल; तिलक वर्माचा एकाकी लढा, अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय
T-20 World Cup 2024 : आपल्या मनाला वाटेल त्या स्पर्धा तो खेळू शकत नाही, इरफान पठाण भडकला
Mumbai Hospital Fire: मुंबईच्या WINS रुग्णालयात आग, चार जण जखमी
मोदींची नौटंकी आता चालणार नाही;‘अब की बार जनता की सरकार’ – प्रियंका गांधी