ऑटोवर गवत; उन्हावर मात करण्याचे जुगाड

ऑटोवर गवत; उन्हावर मात करण्याचे जुगाड

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. देशभरात उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडायला तयार होत नाहीत. त्यात प्रवास करायचा असेल तर आणखी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात, परंतु एका ऑटो चालकाने प्रवाशांची काळजी घेण्यासाठी आपल्या ऑटोवर थेट थंडगार गवत उगवले आहे. त्यामुळे प्रवाशांना थंडगार प्रवास होत आहे. या ऑटो चालकाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत दिसते की, ऑटोला संपूर्णपणे पोत्याच्या गोणीने कव्हर करण्यात आले आहे. यात चारही बाजूने गवत उगवले आहे. त्यामुळे प्रवाशांची उन्हाच्या चटक्यापासून सुटका झाली आहे. या व्हिडीओला सहा लाखांहून जास्त युजर्सनी लाईक केले आहे, तसेच शेकडो लोकांनी कमेंट करून या ऑटो चालकाचे काwतुकसुद्धा केले आहे. एका युजरने लिहिले जर रस्त्यात गाय किंवा म्हैस भेटली तर काय होईल? अशा गमतीशीर कमेंट केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…