Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या

Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये बसताना पडल्या. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दुर्गापूर येथे ही घटना घडल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढत आहे. टीएमसीने शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी दुर्गापूर येथून आसनसोलच्या दिशेने निघाल्या होत्या. येथे त्या एका सभेला संबोधित करणार होत्या. मात्र हेलिकॉप्तरमध्ये बसताना त्यांचे संतुलन बिघडले आणि त्या पडल्या. सुरक्षारक्षकाने तात्काळ मदत केल्याने ममता बॅनर्जी सावरल्या. त्यांची दुखापत गंभीर नसल्याची माहिती मिळत असून त्या आसनसोलकडे रवाना झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. घरामध्ये ट्रेडमिलवर चालताना त्या कोसळल्या होत्या आणि यामुळे त्यांच्या डोक्याला कोच पडली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या जखमेवर तीन टाके घालण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान