IPL 2024 : 22 वर्षांच्या पोराने मुंबईला झुंजवल; तिलक वर्माचा एकाकी लढा, अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय

IPL 2024 : 22 वर्षांच्या पोराने मुंबईला झुंजवल; तिलक वर्माचा एकाकी लढा, अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय

मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. प्रथम गोलंदाजांचा दिल्लीच्या फलंदाजींनी चांगलाच समाचार घेतला. नंतर 258 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या फलंदाजांनी सुद्धा निराशाजनक खेळ केला. तिलक वर्मा पुन्हा एकदा संघासाठी धाऊन आला त्याने 32 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्याला हार्दिक पंड्या (24 चेंडू 46 धावा) चांगली साथ दिली. मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. अटीतटीच्या लढतीत अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय झाला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात घरच्या प्रेक्षकांसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र Jake Fraser-McGurk या 22 वर्षीय ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जॅकने 27 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांची वादळी खेळी केली. सलामीला आलेल्या अभिषेक पोरेलने (27 चेंडू 36 धावा) त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेले दिल्लीचे सर्वच फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांवर तुटुन पडले. शाय होप (17 चेंडू 41 धावा), रिषभ पंत (25 चेंडू 48 धावा) आणि अक्षर पटेल (6 चेंडू 11 धावा) यांच्या अमुल्य योगदानामुळे दिल्लीने मुंबईला 258 धावांचे लक्ष दिले होते.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी चांगला खेळ करता आला नाही. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि टीम डेविड (17 चेंडू 37 धावा) या तीन खेळाडूं व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इशान किशन (14 चेंडू 20 धावा), रोहित शर्मा (8 चेंडू 8 धावा), सूर्यकुमार यादव (13 चेंडू 26 धावा) हे मुंबईचे महत्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान