उतारावरील पार्किंगसाठी हॅण्ड ब्रेक आवश्यकच!

उतारावरील पार्किंगसाठी हॅण्ड ब्रेक आवश्यकच!

 उतारावरील पार्किंगसाठी हॅण्ड ब्रेक लावणे आवश्यकच आहे. हॅण्ड ब्रेक न लावता उतारावर गाडी उभी करणे हा निष्काळजीपणाचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.

मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर रोडवर उतारावर पार्क केलेला टँकर हॅण्ड ब्रेक न लावल्यामुळे मागे आला आणि तेथे उभ्या असलेल्या कारवर धडकला. 29 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघाताला टँकरचालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका दंडाधिकारी नदीम पटेल यांनी ठेवला आणि टँकरचालक सकलदेव साह याला भारतीय दंड संहितेच्या कलम 337 अन्वये दोषी ठरवले. आरोपीने पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा केल्याने न्यायालयाने चांगल्या वर्तनाची हमी मागत दहा हजार रुपयांच्या बॉण्डवर त्याला तुरुंगातून सोडण्याचा आदेश दिला.

सहा महिन्यांपर्यंत शिक्षा

उतारावर गाडी उभी करताना हॅण्ड ब्रेक न लावणे हे निष्काळजीपणाचेच कृत्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या गुह्यात आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 337 अन्वये सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

न्यायालयाची निरीक्षणे

z उतारावर गाडी पार्क केल्यावर चालकाने सर्वप्रथम हॅण्ड ब्रेक लावण्याची पुरेशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे. जेणेकरून ती गाडी आपोआप मागे-पुढे हलूच शकत नाही.  z टँकरचालकाने हॅण्ड ब्रेक लावल्याचा दावा केला असला तरी टँकर आपोआप मागे सरकला आहे. यामागे यांत्रिक दोष नव्हे, तर टँकरचालकाने हॅण्ड ब्रेक लावला नव्हता हेच स्पष्ट होते.

जखमीला भरपाई देण्याचे आदेश

रस्त्यावर उतार असल्याचे पाहूनही टँकर पार्क केला. त्याची ही घोडचूक कारमालकाच्या जिवावर बेतणारी ठरली असती. त्यामुळे न्यायालयाने त्याला दंडाचा झटका दिला. अपघातात जखमी झालेले कारमालक झा यांना भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचा आदेश दंडाधिकाऱयांनी टँकरचालकाला दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता? माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात...
प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी
‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी बनली ‘हिरामंडी’ची आलमजेब; नेटकरी म्हणाले ‘भन्साळींनी हिलाच निवडलं..’
‘त्या’ दिवशी फार घालमेल झाली…; शिवा मालिकेत ‘सिताई’ साकारणाऱ्या अभिनेत्रीला अश्रू अनावर
देशभरातील हवा बदलली, 4 जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार – शशी थरुर
निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे जुगारावर धाड; 60 पेक्षा जास्तजण ताब्यात, मुद्देमाल जप्त
अप्पू अन् दगडू पहिल्यांदाच एकत्र; प्रथमेश-ज्ञानदाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला