दंड ठोठावण्याआधी माती तपासा; हायकोर्टाची मिंधे सरकारला चपराक, आयकिया कंपनीचा पाच कोटींचा दंड रद्द

दंड ठोठावण्याआधी माती तपासा; हायकोर्टाची मिंधे सरकारला चपराक, आयकिया कंपनीचा पाच कोटींचा दंड रद्द

उत्खननाची माती खनिज आहे की नाही हे तपासूनच यापुढे दंड ठोठावा, असे सक्त आदेश उच्च न्यायालयाने मिंधे सरकारला दिले आहेत. आयकिया कंपनीला ठोठावलेला 5 कोटी 77 लाख 96 हजार 338 रुपयांचा दंड व रॉयल्टी न्यायालयाने रद्द केली. यामुळे मिंधे सरकारला चांगलाच झटका बसला आहे.

या दंडाविरोधात आयकिया कंपनीने याचिका केली होती.  न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. सोमेश्वर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. कंपनीला दिलेली वसुलीची नोटीस, मालमत्ता जप्तीचे आदेशही न्यायालयाने रद्द केले.

 न्यायालयाचे आदेश

उत्खनन करणाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्या. या नोटीसचे उत्तर आल्यानंतर ते तपासा. उत्खननाचा उद्देश व मातीचा वापर कशासाठी केला जाणार आहे हे नीट बघूनच रॉयल्टी व दंड आकारा. n उत्खननासाठी बाजारभावाच्या पाच पट दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र चूक जाणीवपूर्वक केलेली आहे की अनावधानाने झाली आहे याची शहानिशा केल्यानंतरच दंड आकारला पाहिजे.

रॉयल्टी दंड आकारताना तहसील कार्यालयाने डोके वापरले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा संदर्भही वापरला गेला नाही. पहिल्या कारणे दाखवा नोटीसमधील मुद्दे दुसऱ्या कारणे दाखवा नोटीसमध्ये होते. अन्य मुद्यांचा विचारच केला गेला नाही. केवळ विनापरवाना उत्खनन करण्यात आल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

काय आहे प्रकरण

तुर्भे येथे आयकिया कंपनीचे शोरूम आहे. 96 हजार 250 चौ. मी. जागा कंपनीने भाडेतत्त्वावर घेतली आहे. शोरूमच्या बांधकामासाठी कंपनीने ही जागा खणली. 18 डिसेंबर 2020 रोजी शोरूम सुरू झाले. सुमारे पाच हजार ब्रास अनधिकृतपणे उत्खनन झाल्याचा ठपका तहसील कार्यालयाने कंपनीवर ठेवला. यासाठी 22 लाख 12 हजार 800 रुपयांची रॉयल्टी व 5 कोटी 53 लाख 20 हजार रुपयांचा दंड कंपनीला ठोठावण्यात आला. या रकमेच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची नोटीसही कंपनीला देण्यात आली. आम्ही कारणे द्या नोटीसला उत्तर दिले आहे. हे उत्तर ग्राह्य धरून या नोटीस रद्द कराव्यात, अशी विनंती केली. ती मान्य न झाल्याने कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…