मराठवाडय़ात दुसऱया दिवशीही अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात दुसऱया दिवशीही अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात सलग दुसऱया दिवशीही अवकाळी पावसाने बीड, लातूर, जालना जिल्हय़ास झोडपून काढले. अवकाळीने दिलेल्या तडाख्याने शेतशिवाराची रया गेली असून आंबा, सीताफळ, डाळिंब, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. वीज पडून मराठवाडय़ात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाचा जोर 15 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुरुवारी बीड जिल्हय़ाला दोन तास अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. अवकाळी पावसाचा जोर एवढा होता की भरउन्हाळय़ात नदी, नाले खळाळून वाहिले. या पावसाने जिल्हय़ातील फळबागा, मिरची, उन्हाळी बाजरी तसेच मक्याचे अतोनात नुकसान झाले. केशर आंब्याचा सडाच पडला. टरबुजाची प्रचंड नासाडी झाली. शुक्रवारीही गेवराई, वडवणी, अंबाजोगाईला अवकाळीने दणका दिला. माजलगाव, परळीतही दिवसभर पावसाळी वातावरण होते. गेवराई तालुक्यात मन्यारवाडी शिवारात वीज पडून मीना गणेश शिंदे (35) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओंकार (15) हा गंभीर जखमी झाला. बीड, लातूरपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, जालन्यासही अवकाळीने चांगलाच तडाखा दिला. पैठण तालुक्यात टाकळी अंबड येथे वीज पडून सुधाकर पाचे या शेतकऱयाचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातही अनेक ठिकाणी अवकाळीने दाणादाण उडवली. उंडणगाव येथे मोटारसायकलवर वीज पडल्याने जाबेर शेख रऊफ (22) हा ठार झाला तर त्याची आई हाजराबी ऊर्फ शबाना शेख रऊफ (45) या गंभीर जखमी झाल्या.

पंढरपूरलाही आज तिसऱयाही दिवशीही पावसाने हजेली लावली. आंबा, द्राक्षे, डाळिंब, जांभूळ, शेवगा या पिकांना फटका बसला आहे. द्राक्षांचे नुकसान झाले आहे, तर पैऱयांचा सडा पडला आहे. पंढरपूर शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.

बीडला झोडपले

गुरुवारी दोन तास बालाघाटला झोडपल्यावर निसर्ग शांत होईल असे वाटत असतानाच शुक्रवारीही अवकाळीने गेवराईचा गोदाकाठ, वडवणीतील डोंगरपायथ्याला जबर तडाखा दिला. काही भागांत गारपिटीचे तुफानही आले. दोन दिवसांच्या अवकाळीने शेतशिवाराची रयाच घालवली असून आंबा, सीताफळ, डाळिंबाच्या बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला