पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या निकषात यूजीसीकडून बदल

पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या निकषात यूजीसीकडून बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या निकषात मोठे बदल केले आहेत. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG देखील उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या आशयाचे पत्र यूजीसीने सर्व राज्य शिक्षण मंडळांना पाठवले आहे.

देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना त्यांच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना CUET UG 2024 बद्दल जागरूक करावे लागेल. देशभरातील विद्यापीठे CUET UG मेरिटच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसह पदवीपूर्व प्रवेशासाठी CUET UG 2024 चा ऑनलाइन अर्ज भरावा लागनार आहे. पदवीपूर्व प्रवेशाचे नियम विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राज्य शिक्षण मंडळांनी CUET UGची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. CUET UG 2024 साठी उमेदवार 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, असे पत्र यूजीसीचे  सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांच्या वतीने राज्य शिक्षण मंडळांना पाठवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला? ‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला?
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या...
‘सोढी’ बेपत्ता, तारक मेहताच्या भिडेने केला मोठा खुलासा, म्हणाला, दिल्ली ते मुंबई..
प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह, शेवटचं Whatsapp Status पोस्ट करत म्हणाली…
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार
नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार, अस्वच्छतेचा वाचवा पाढा
अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा