कोकणी माणूस जागा झाला! दापोलीच्या ओळगावात परप्रांतीयांना जमीन खरेदी करण्यास सक्तमनाई

कोकणी माणूस जागा झाला! दापोलीच्या ओळगावात परप्रांतीयांना जमीन खरेदी करण्यास सक्तमनाई

>> दुर्गेश आखाडे

परप्रांतीय कोकणात येऊन कवडीमोलाने जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहे.एजंटच्या आमिषाला बळी पडून कोकणातील माणूस आपल्या वाडवडीलांनी जपलेल्या जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वत: भूमिहिन होत आहे.परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे.अशावेळी कोकणी माणूसही जागा होऊ लागला आहे.याची पहिली सुरूवात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून झाली आहे.दापोली तालुक्यातील ओळगाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येत कुणीही गावाबाहेरील व्यक्तीला जमीन विकायची नाही असा निर्णय घेतला असून बाहेरील व्यक्तींना जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई अशा आशयाचे फलक गावात उभारून जनजागृती करण्यात आली आहे.

कोकणात परप्रांतीय मोठ्या संख्येने जमिनी करत आहेत.कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे.दलालांच्या माध्यमातून कोकणातील जमिनी घशात घालण्याचे डाव आखले गेले आहेत.नाणार असो किंवा बारसू यापरिसरात परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत.त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा तालुका असलेल्या दापोलीतही मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी झालेल्या आहेत.परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली असून त्याची सुरूवात दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे.ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत.त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे.ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो.अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात.अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.

152 कुटुंबाच्या छोट्याशा गावचा आदर्श

बाहेरील व्यक्तीला गावातील जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई करण्याचा ओळगावाने महत्वपूर्ण निर्णय घेतला.152 कुटुंब असलेल्या छोट्याशा ओळगावाने घेतलेला निर्णय”ओळ” अधोरेखित करण्यासारखा निर्णय असून इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन आपल्या जमिनी विकू नयेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती निवडणुकीचे EVM असलेल्या स्ट्राँग रुममधील CCTV 45 मिनिटं बंद, पाहा व्हिडीओ Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती निवडणुकीचे EVM असलेल्या स्ट्राँग रुममधील CCTV 45 मिनिटं बंद, पाहा व्हिडीओ
बारामतीच्या निवडणुकीचे सर्व ईव्हीएम पुण्यात ज्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथं तब्बल 45 मिनिटं सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचा आरोप शरद...
video viral : मुंबईतील धुळीच्या वादळाचा विहंगम व्हिडीओ, एकदा पाहाच
‘मी इथे दबलोय, मला वाचवा…’, नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना ‘ती’ ढसाढसा रडली
घाटकोपर घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मेरा पती कहाँ है… घाटकोपर दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश; राजावाडी रुग्णालयात गर्दी
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठी अपडेट, काय घडणार?
लहानपण देगा देवा…; ‘नवरी मिळे हिटलर’ मालिकेतील लीला रमली बालपणीच्या आठवणीत