नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार, अस्वच्छतेचा वाचवा पाढा

नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार, अस्वच्छतेचा वाचवा पाढा

नगर-दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीशहरातील उघड्यावरील कचरा व ठिकठिकाणच्या दुर्गंधीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या Department of Administrative Reforms and Public Grievances च्या नोडल एजन्सीकडे लंके यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.

मी निलेश लंके नगर शहरात नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांची शहरातील रस्त्यांवरील व खुल्या जागेवरील कचऱ्याच्या ढिगारांबाबत, कचरा गाडी वेळोवेळी न येणे, अस्वच्छता व दुर्गंधी बाबत नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांनी व नगरसेवकांनी वेळोवेळी अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना व प्रशासनाला याबाबत तक्रार केली आहे.तरी त्यांच्याकडून याबाबत काही ठोस कारवाई झाली नाही. आपल्याला विनंती आहे की या समस्यामुळे शहरात अस्वच्छता, दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती, असे लंके यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

लंके यांच्या तक्रारीची केंद्राकडून दखल

दरम्यान, निलेश लंके यांनी नगर शहरातील अस्वच्छतेबाबत केंद्राकडे तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम पाटील यांना याप्रश्नी चौकशी करून कारवाही करण्याचे आदेशीत केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या ‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या छेडानगर येथे पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर...
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन 
भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन
कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार
लूटालूट! उद्या संजय राऊत करणार नाशिक महानगरपालिकेतील 800 कोटींच्या घोटाळ्याची पोलखोल
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती निवडणुकीचे EVM असलेल्या स्ट्राँग रुममधील CCTV 45 मिनिटं बंद, पाहा व्हिडीओ