हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म…पेटू दे शिवसेनेची मशाल! रत्नागिरीत मशाल रॅलीने प्रचाराचे रान पेटवले

हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म…पेटू दे शिवसेनेची मशाल! रत्नागिरीत मशाल रॅलीने प्रचाराचे रान पेटवले

इंडिया आघाडीचा विजय असो…शिवसेना जिंदाबाद…उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…विनायक राऊत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आज सायंकाळी रत्नागिरी शहरातून इंडिया आघाडीची मशाल रॅली निघाली.

जयस्तंभ येथून मशाल रॅलीला प्रारंभ झाला.अंगावर रोमांच उमटवणाऱ्या मशाल गीतावर हि रॅली पुढे सरसावली.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार,कॉंग्रेस आणि आप या सर्व पक्षांची मज़बूत वज्रमूठ या रॅलीत पहायला मिळाली.शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली ही मशाल रॅली काढण्यात आली.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, नौसीन काझी, काँग्रेसचे दिपक राऊत, ॲड अश्विनी आगाशे, महिला उपजिल्हासंघटक ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग, शहर संघटक मनिषा बामणे, दुर्गेश साळवी, रूची राऊत, प्रसाद सावंत, साजिद पावसकर, रशिदा गोदड व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…