बृजभूषण सिंह यांना झटका, लैंगिक छळाची पुनर्विचार याचिका फेटाळली

बृजभूषण सिंह यांना झटका, लैंगिक छळाची पुनर्विचार याचिका फेटाळली

महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना न्यायालयाने झटका दिला आहे. लैंगिक छळासंबंधीच्या प्रकरणात नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सिंह यांनी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली आहे.

ऑलिम्पिकपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह इतर काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याविषयी आरोप निश्चिती व्हावी यासाठी दिल्लीच्या स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोणतेही आदेश देण्यापूर्वी काही पैलूंबाबत अधिक तपास व्हावा, अशी मागणी सिंह यांनी केली होती. तसंच, या प्रकरणात नव्याने तपास सुरू करण्याची मागणी करणारी याचिका सिंह यांनी दाखल केली होती.

आपल्यावरील आरोपांविषयी युक्तिवाद सादर करण्यासाठी तसंच पुढील तपासासाठी अधिक वेळ द्यावा, अशी विनंती सिंह यांनी केली होती. मात्र, ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. या प्रकरणातील पुझील सुनावणी आता 7 मे रोजी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान