Nestle च्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचे प्रमाण जास्त! अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Nestle च्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचे प्रमाण जास्त! अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सगळेच पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत नेहमी सतर्क असतात. आपली मुले निरोगी राहावीत म्हणून आपण त्यांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालतो. बाजारात उपलब्ध असलेले प्रथिने आणि जीवनसत्त्वेयुक्त प्रोडक्ट्सचा आपण लहान मुलांच्या आहारात वापर करतो. मात्र अशा परिस्थितीत ही उत्पादने कितपत विश्वासार्ह आहेत याबाबत पब्लिक आयच्या तपास संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नेस्ले कंपनीच्या भारतात विकल्या जाणाऱ्या सेरेलॅक पॅकमध्ये ३ ग्रॅम अतिरिक्त साखर असल्याचे समोर आले आहे. याशिवाय इतर आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्येही अशी भेसळ उघडकीस आली आहे.

द गार्डियनमधील वृत्तानुसार, पब्लिक आयने आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील नेस्ले कंपनीची विकली जाणारी बेबी-फूड उत्पादने चाचणीसाठी बेल्जियमच्या प्रयोगशाळेत पाठवली प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या 150 उत्पादनांमध्ये प्रति चमचा 4 ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले आहे. तर फिलीपिन्समध्ये 6 महिन्यांच्या बाळांसाठी विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये 7.5 ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले. तर हिंदुस्थानात विकल्या जाणाऱ्या 15 सेरेलॅक उत्पादनांमध्ये प्रति चमचा 2.7 ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, अमेरिका, जर्मनी, स्वीत्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये नेस्लेची ही उत्पादने साखरमुक्त आहेत.

नेस्ले इंडिया कंपंनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी उत्पादने बनवताना सगळ्या स्थानिक नियमांचे पालन करूनच बनवते. गेल्या पाच वर्षांत, कंपनीने आपल्या बेबी प्रोडक्ट श्रेणीतील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी केले आहे. नेस्लेने 2022 मध्ये भारतात 20 हजाार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सेरेलॅक उत्पादने विकली आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), साखर किंवा गोड पदार्थ 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या जेवणात वापरू नयेत. कारण साखर मिसळल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो . शरीरात खराब कोलेस्टेरॉल, मधुमेह, दातांमधील पोकळी, मानसिक आरोग्य, कमकुवत प्रतिकारशक्ती, अल्झायमरचा धोका आणि पांढऱ्या रक्त पेशी कमकुवत होतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला