साताऱयात प्रचंड गारपीट

साताऱयात प्रचंड गारपीट

जिह्याला आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सातारा शहरासह कराड, कोरेगाव, वाई, जावली, फलटण आदी तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱयासह पावसाने दणका दिला. अनेक ठिकाणी प्रचंड गारपीटही झाली. वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेचे आणखीनच हाल झाले.

आजही सकाळपासून उन्हाचे चटके बसत होते. जिह्याच्या पूर्वेकडील माण, खटाव, फलटण तालुक्यांमध्ये आगडोंब उसळल्यासारखे चित्र झाले आहे. अशात दुपारी तीननंतर विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱयासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सातारा शहरासह कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर परिसराला सायंकाळी पावसाने झोडपून काढले. वाऱयामुळे रहिमतपूर येथे महाबळेश्वर-विटा मार्गावर निवडणुकीसाठी उभारलेला स्थिर सर्वेक्षण पथकाचा मंडप कोसळला. पावसावेळी गारांचाही वर्षाव झाला.

जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात दीड तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. जावलीतील मेढा, कुसुंबी, केळघर परिसरातही पाऊस झाला. कराड तालुक्यातील मसूर येथे पंढरपूर मार्गावरील एक झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळनंतर फलटण तालुक्यातही पावसाला सुरुवात झाल्याचे वृत्त होते. दरम्यान, वादळी पावसामुळे जिह्यात बऱयाच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जीवघेण्या उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेची अक्षरशः उलघाल झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला