तात्या विंचू परत येतोय!
‘ओम फट् स्वाहा’ म्हणत येणारा तात्या विंचू पाहिला की अनेकांची घाबरगुंडी उडायची. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी तात्या विंचू सज्ज झालाय. आदिनाथ कोठारे याने ‘झपाटलेला-3’चे पोस्टर शेअर करत पुढच्या वर्षी हा चित्रपट येणार असल्याचे सांगितले. पोस्टरमध्ये कपाळावर गोळी लागलेला तात्या विंचू आणि आदिनाथ कोठारे दिसतोय. ‘झपाटलेला… मी तात्या विंचू’ असे या चित्रपटाचे नाव असून दिग्दर्शनाची धुरा महेश कोठारे हेच सांभाळणार आहे. चित्रपटाबद्दल आतापासूनच उत्सुकता वाढलीय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List