नुकसानभरपाई मिळण्यासाठी रचला अपघाताचा बनाव, नगरमधील पाचजणांवर गुन्हा दाखल

नुकसानभरपाई मिळण्यासाठी रचला अपघाताचा बनाव, नगरमधील पाचजणांवर गुन्हा दाखल

अपघाताची नुकसानभरपाई मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी इन्शुरन्स विमा कंपनीची फसवणूक केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून समोर आले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सीआयडीच्या कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नगर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दावेदार आबासाहेब चिमाजी वडीकते (वय 40, रा. कडीत बुद्रूक, ता. श्रीरामपूर), तपासी अंमलदार देवीदास काशिनाथ भडकवाड (वय 48, रा. पोलीस मुख्यालय, नगर), वाहनचालक अल्ताफ सलीम शेख (वय 36, रा. सुभाष कॉलनी, नेवासा रस्ता, श्रीरामपूर), वाहनमालक यासीन सरदार शेख (वय 47, रा. सिद्धार्थनगर, कॉलेज रस्ता, श्रीरामपूर), प्रत्यक्ष वाहन ताब्यात असलेला व्यक्ती राजमहंमद सरदार शेख (वय 54, रा. सक्रापूर, लांडेवाडी, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीने संशय व्यक्त केलेल्या मोटार अपघात दाव्याची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. आबासाहेब वडीकते याने दाखल केलेल्या मोटार अपघात दाव्याची फिर्याद पोलीस निरीक्षक पाटील यांनी चौकशी केली. वडीकते याने 5 जून 2016 रोजी अपघात झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दुचाकीला 21 एप्रिल 2016 रोजी टेम्पोने (एमएच 17 बीडी 3639) धडक दिल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते. याबाबत निरीक्षक पाटील यांनी दावेदार, वाहनमालक व चालक, इतर साक्षीदार व तपासी अंमलदार यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जवाब नोंदविले.

सदर मोटार अपघात दावा चौकशीमधील साक्षीदार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, पिपाडा मोटर्स यांनी दिलेला अहवाल, उपलब्ध दस्तऐवज, सिटी केअर हॉस्पिटलमधील मूळ एमएलसी, तोफखाना पोलीस ठाण्यातील दाखल गुह्याची कागदपत्रे याची पडताळणी करण्यात आली.

संशयित आरोपींनी आपापसात संगनमत करून कटकारस्थान रचून विमा कंपनीकडून अपघाताचा आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार केला. न्यायालयात खोटे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालय, नगर येथे अपघात दावा नुकसानभरपाई रक्कम मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी विमा कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…