आरोग्य- आयुर्वेदातील सुपरफास्ट चिकित्सा

आरोग्य- आयुर्वेदातील सुपरफास्ट चिकित्सा

>> वैद्य चंद्रकुमार देशमुख

सध्याच्या काळात आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पद्धती जास्त गुणकारी आहे. आजार कायमचा बरा करावा आयुर्वेदातील चिकित्सा पद्धती म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म.

एखाद्या पिझ्झा खाणाऱया लोकांना पिझ्झाबद्दल अतीव आकर्षण असते. त्यातले चीझ, मैदा, अतिरिक्त कॅलरीज, बेक केल्यामुळे पचण्यास जड असे कितीही तोटे असले तरीही हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्याचप्रमाणे वेदनाशमन करणारी औषधे आरोग्यासाठी नुकसानकारक असली तरीही पिझ्झाप्रमाणेच रोज खावी वाटतात, परंतु आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पद्धती नको असते.

आजार कायमचा बरा करावा यासाठी सवड नसणाऱया लोकांना कानउघाडणी करणारी चिकित्सा म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म. विद्धकर्म व अग्निकर्म चिकित्सा अजूनही जनमानसात रुजू झालेली नाही. त्याचे कारणही तसेच आहे. आयुर्वेद वैद्य या चिकित्सेबद्दल अभ्यासतो, परंतु ही चिकित्सा करण्यासाठी जे प्रशिक्षण लागते त्याच्या अभावामुळे आपल्या जवळील आयुर्वेद वैद्य ही चिकित्सा अवलंबताना दिसत नाहीत.

विद्धकर्म ः हृदयातील रक्तवाहिनीमधील गाठी काढल्यानंतर जसा रक्तपुरवठा परत सुरू होतो आणि मृत्यू समीप पोहोचलेल्या व्यक्तीला जीवन मिळते, त्याचप्रमाणे रक्त पुरवठा, रक्तामधील वात-पित्त-कफ दोष इत्यादी दूषित झाल्यानंतर शरीरात जे आजार तयार होतात त्या आजाराचे कारण असलेल्या रक्ताला शुद्धीकरण करणे, त्याला मार्ग मिळवून देणे म्हणजे विद्ध चिकित्सा. ही चिकित्सा आयुर्वेदातील पंचकर्मामधील रक्तमोक्षण या चिकित्सेचा भाग आहे. या रक्तमोक्षण चिकित्सेत जळवा लावणे, श्रुंग लावून रक्त काढणे, अलाबू अथवा कोहळा लावून रक्त काढणे हे केले जाते,

या विद्धकर्म चिकित्सेमध्ये एक छोटीशी सुई वापरून शरीरातील विशिष्ट भागामध्ये विशिष्ट प्रमाणात आत टाकून तेथील अडकलेला वायू, रक्त, द्रव संचिती यांना मार्ग मिळवून दिला जातो आणि कष्टाने बरे होणारे विकार लगेच बरे केले जातात. म्हणजे सूक्ष्म विद्ध केले असता अव्यक्त स्वरूपात रक्तमोक्षण होऊन आजार मुळापासून बरे होतात. आपल्या मानवी शरीरात 107 अशा जागा आहेत, ज्यांना आयुर्वेदात मर्म म्हणतात. त्या जागांच्या ज्ञानाचा वापर करून ही चिकित्सा आलेली आहे. अशा या सर्व मर्मस्थानाचा विचार करूनच प्रत्येक व्याधीमध्ये विद्धकर्म चिकित्सेने अगदी अल्प काळात रुग्णाला बरे वाटते.

अग्निकर्म ः जो व्याधी औषधांनी बरा नाही होत, त्यावर शास्त्रकर्म करतात, जो शास्त्रकर्म करून बरा नाही होत त्यावर अपुनर्भ अशी चिकित्सा म्हणजे अग्निकर्म आहे. अग्नी म्हणजे आग, तेज तत्त्व आणि याचा वापर करून आजार समूळ नष्ट केला जातो.

आज कर्करोगावर Radiation or Chemotherapy केली जाते ते अग्निकर्म आहे. शास्त्रकर्म करताना एखाद्या रक्तवाहिनीमधील रक्तस्राव थांबविण्यासाठी cautary वापरली जाते. तेही अग्निकर्म आहे. पायात काटा मोडून कुरूप आले असता त्याला गुळाने, बिब्ब्याने अथवा गरम लोहशलाकेने जाळून टाकणे म्हणजे अग्निकर्म आहे. चेहऱयावर मस, जामखीळ, तीळ आले असता ते मायक्रो अग्निकर्म करून काढून टाकले जाते  दात दुखत असताना त्यावर आयुर्वेदातील लाखेने अग्निकर्म केले असता रूट कॅनलची गरज नाही पडत अथवा फिलिंगची गरज नाही पडत. अग्नी या तत्त्वाचा वापर करून शरीरातील आजार बरा करण्यासाठी वापर केला जातो.

सुवर्णशलाका ः सोन्याची शलाका ही विशेषत हाडांच्या विकारावर आम्ही वापरतो. पूर्वी राजेमहाराजे लोक युद्धात मार लागला असता तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रत्येक सांध्यावर सोने घालत होते. सोने हा एकमेव धातू असा आहे, जो शरीरामधील धातूंचे पोषण करतो. याच धातूची शलाका बनवून अग्निकर्म केले असता वाताच्या आजारावर उत्तम कार्य होते.

मृत्तिका शलाका ः मातीची शलाका बनवून टाचेचे हाड वाढलेले असता त्या ठिकाणी शेक दिला जातो आणि शास्त्रकर्म करूनही बरे न होणारे टाचेचे हाड लगेच बरे होते.

हळकुंड ः कावीळ जर कोणत्याही औषधाने उतरत नसेल तर याच अग्निकर्माचा वापर करून व्यक्तीचे लिव्हर वाचते.

लोहशलाका ः याने हातापायांवर आलेले कुरूप जाळले जातात.

चांदीची शलाका ः शरीरातील मज्जासंस्थेचे आजार बरे करण्यासाठी वापरले जातात.

रत्न अग्निकर्म ः अध्यात्म वापरून काही व्याधींवर चिकित्सा केली जाते. त्याला दैवव्यापाश्राय चिकित्सा म्हणतात. या चिकित्सेत रत्न वापरून राशीनुसार अग्निकर्म आम्ही करतो.

अग्निकर्म म्हणजे अघोरी चिकित्सा नव्हे. ही चिकित्सा आयुर्वेद ग्रंथामध्ये वर्णित केलेली शास्त्राrय चिकित्सा आहे. फक्त आयुर्वेद चिकित्सा करणाऱया वैद्याला ही कशी करायची हे माहिती नसल्याने याचे जनमानसात महत्त्व समजलेले नाही असे आम्हाला दिसते. या दोन्ही विद्धकर्म आणि अग्निकर्म चिकित्सा शरीररचनेचे ज्ञान असलेला तसेच आयुर्वेद शास्त्र जाणणारा व्यक्तीच करू शकतो. ज्याप्रमाणे यूटय़ूबवर अपेंडिक्सचे ऑपरेशन पाहून आपण करत नाही त्याप्रमाणे इतर लोकांनीही याचे ज्ञान नसताना वापर करू नये. ही विद्धकर्म अग्निकर्म चिकित्सा कायम फलदायी म्हणण्याचे कारण म्हणजे रुग्ण वेदनाशामक औषधी विकत आणेपर्यंत रुग्ण बरा होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या ‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या छेडानगर येथे पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर...
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन 
भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन
कोपरगावमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार
लूटालूट! उद्या संजय राऊत करणार नाशिक महानगरपालिकेतील 800 कोटींच्या घोटाळ्याची पोलखोल
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती निवडणुकीचे EVM असलेल्या स्ट्राँग रुममधील CCTV 45 मिनिटं बंद, पाहा व्हिडीओ