महुआ मोइत्रा यांनी EDच्या चौकशीला सामोरे जाण्यास दिला नकार, म्हणाल्या…

महुआ मोइत्रा यांनी EDच्या चौकशीला सामोरे जाण्यास दिला नकार, म्हणाल्या…

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांनी आज ED च्या चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. ED ने बुधवारी महुआ आणि दर्शन हिरानंदानी यांना समन्स बजावून गुरुवारी चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले होते. दोघांविरुद्ध फेमा कायदा म्हणजेच परकीय चलन विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र महुआ यांनी नकार दिला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ED ला परकीय चलन विनियम कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार महुआ यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवायचे आहेत. महुआ यांच्याविरोधात NRI खात्यात झालेली देवाण घेवाण यांसंबंधित तपास सुरू आहे. याव्यतिरिक्त विदेशात पैसे पाठवण्याबाबत अन्य प्रकरणाचाही तपास सुरू आहे. हा पैसा कुठून आला आणि कोणत्या उद्देशाने हस्तांतरित करण्यात आला यासाठी mahua moitra आणि दर्शन हिरानंदानी यांची चौकशी करायची आहे. महुआ मोइत्राविरुद्धही केंद्रीय तपास यंत्रणाही चौकशी करत आहे. त्यांच्या विरोधाच कॅश फॉर क्वेरी याप्रकरणी तपास सुरू आहे. ईडीने 28 मार्च गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यांनी निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला तर दर्शन हिरानंदानीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला आहे की, महुआ मोइत्रा यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत महुआ मोइत्रा दोषी आढळल्यानं त्यांना निलंबित केले होते. त्यांच्यावर आरोप आहे की, महुआ मोइत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना आपल्या संसदेचा लॉगइन आयडी दिली होती आणि त्यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी अदानी यांच्याविरोधात प्रश्न विचारले होते. टीएमसीने पुन्हा एकदा महुआ मोइत्रा यांना उमेदवार बनवले आहे. त्या पुन्हा एकदा कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील
महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते...
भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
‘सोढी’ बेपत्ता, या कलाकाराने केले मोठे विधान, म्हणाला, त्याच्या कुटुंबियांना..
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणीमध्ये वाढ, साहिल खान पोलिस कोठडीत, म्हणाला..
थेट मुलाला घेऊन एक्स पतीच्या घरी पोहचली मलायका अरोरा, अरबाज खान..
अभिनेत्रीचा दोनदा घटस्फोट, मुलीनेही सोडली साथ, मोठा खुलासा करत म्हणाली…
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची – शरद पवार