IPL 2024 : ‘रॉयल’ विजयासह राजस्थानचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; लखनऊचा 7 विकेट्सने पराभव

IPL 2024 : ‘रॉयल’ विजयासह राजस्थानचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; लखनऊचा 7 विकेट्सने पराभव

लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी मैदानात रंगलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघाने यजमान संघाचा 7 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफमध्ये मोठ्या झोकात प्रवेश केला. लखनऊने विजयासाठी दिलेले 197 धावांचे आव्हान राजस्थानने 6 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. 9 लढतीत 8 विजयांसह 16 गुण घेऊन प्ले ऑफमध्ये पोहोचणारा राजस्थान पहिला संघ ठरला आहे.

लखनऊने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या जोडीने अर्धशतकीय सलामी दिली. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बटलर (34) बाद झाला आणि ही जोडी फुटली. पाठोपाठ जैस्वालही (24) बाद झाला. त्यानंतर आलेला रियान परागही (14) आल्या पावली माघारी परतला. त्यामुळे बिनबाद 60 वरून 3 बाद 78 अशी राजस्थानची अवस्था झाली.

तीन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी डावाची सुत्र हाती घेतली. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. संजू सॅमसन याने कर्णधारपदाला साजेशी फटकेबाजी करत 33 चेंडूत नाबाद 71 धावा चोपल्या. यात त्याच्या 7 चौकारांचा आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तर ध्रुव जुरेल यांनेही आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. दोघांनी राजस्थानला 19 षटकांमध्ये विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊची सुरुवात खराब झाली होती. फॉर्मात असणारा क्विंटन डी कॉक 8 आणि स्टॉयनिस शून्यावर बाद झाला. 2 बाद 11 धावा असा संकटात सापडलेला डाव कर्णधार केएल राहुल आणि दिपक हुड्डाने सावरला. दोघांनी शतकीय भागिदारी केली. राहुलने 48 चेंडूत 76, तर हुड्डाने 31 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर इतर फलंदाजांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे लखनऊला 20 षटकात 5 बाद 196 धावांपर्यंत मजल मारता आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी