मतदान करायला यायचं हं..! मतदार नवरा, लोकशाही नवरी; अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

मतदान करायला यायचं हं..! मतदार नवरा, लोकशाही नवरी; अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे आणि मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी निवडणूक आयोग, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यक्तींकडून प्रयत्न केले जात असून यासाठी नामी युक्त्याही लढवल्या जात आहेत. अशातच चंद्रपूरमध्ये सध्या एका लग्नपत्रिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही पत्रिका आहे चि. मतदार (भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव) आणि चि. सौ. का. लोकशाही (भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या) यांच्या लग्नाची. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. येथे 19 एप्रिल रोजी जवळपास 2118 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. लोकशाहीचा हा उत्सव म्हणजे लग्नसोहळाच असल्याची कल्पना करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आनंदवन येथील अंध विद्यालयाचे कलाशिक्षक परमांनद तिराणिक यांनी 50 पैशांच्या पोस्टकार्डवर ‘लोकशाहीचा शुभविवाह’ ही अनोखी लग्नपत्रिक स्वत:च्या हस्ताक्षराने तयार केली आहे.

नुकतेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीमध्ये नाव आलेल्या तरुण मतदारांना या लग्नपत्रिकेद्वार मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिराणिक यांनी या पोस्टकार्डवर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनाचा वापर करत ही पत्रिका तयार केली आहे.

वैशाख शु. 11, शुक्रवार, 19 एप्रिल 2024 रोजी सकाळई 7 ते सायंकाळी 5 या शुभ मुहूर्तावर लोकसभा 2024 च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदान रुपी आशिर्वादाने हा उत्सव साजरा व्हावा यासाठी हेच निमंत्रण अगत्याचे, असे या पत्रिकेवर नमूद करण्यात आले आहे. तसेच मतदानाला जाताना ओळखपत्र जवळ बाळगण्याचे आवाहनही यात करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा
अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी...
सोळाव्या वर्षी लग्न, सेल्स गर्लचं काम, अपघातात जीव गमावलेली पवित्रा जयराम कोण होती?
‘या’ कुटुंबातील एकटा मुलगा कमावतो कोट्यवधींची माया, जगतात रॉयल आयुष्य
‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता स्पॅनिश उद्योजकाला करतेय डेट, एग्स फ्रीज करण्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
महिन्याभरात दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार, चंद्रपुरातील मतदानाची चर्चा
माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा
कोपरगावमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान उत्स्फूर्त प्रतिसाद