चीनमध्ये चक्रीवादळाचा हाहाकार, 5 ठार 33 जखमी

चीनमध्ये चक्रीवादळाचा हाहाकार, 5 ठार 33 जखमी

चीनमध्ये सध्या चक्रीवादळ आणि पावसामुळे हाहाकार उडाला आहे. यादरम्यान 5 जण ठार तर 33 जण जखमी झाले. या वादळाचा सर्वाधिक फटका ग्वांगझू शहरासह परिसरात बसला आहे. या भागात वादळी वार्‍यांसह मुसळधार पावासाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे वार्‍यांचा वेग 20.6 मीटर प्रतीसेंकद नोंद झाली आहे.

चीनमध्ये सुरु असलेल्या या वादळामुळे अनेक घरे, वीजेचे खांब जमीनदोस्त झाले. तूफान वादळामुळे 141 कारखान्यांच्या बांधकामांचे मोठे नुकसान झाले. मदत व बचाव पथकाने ताबडतोब पथके तैनात करून मदतीचे अभियान पूर्ण केले. गेल्या वर्षीही चीनच्या ग्वांगझू शहरात भीषण वादळात 10 जणांचा मृत्यू झाला होता. टायफून हायकुई नावाच्या या वादळाने ग्वांगझूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हाँगकाँगपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेले ग्वांगझू शहर हे ग्वांगडोंग प्रांताची राजधानी आहे. हे चीनचे औद्योगिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या भागात अनेक कारखाने आहेत, जे मोठ्या प्रमाणात चीनी मालाची निर्यात करतात. ग्वांगडोंग प्रांत काही काळापासून हवामानाचा तडाखा सहन करत आहे. आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चीनच्या हवामान खात्याने महिनाअखेरीस मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शोकांतिका म्हणायचं की दुर्दैव? 14 जणांचा बळी घेणाऱ्या घाटकोपरच्या ‘त्या’ होर्डिंगची ‘लिम्का बुक रिकोर्ड’मध्ये नोंद शोकांतिका म्हणायचं की दुर्दैव? 14 जणांचा बळी घेणाऱ्या घाटकोपरच्या ‘त्या’ होर्डिंगची ‘लिम्का बुक रिकोर्ड’मध्ये नोंद
मुंबईत काय सुरु आहे तेच सर्वसामान्यांना कळणं आता कठीण होऊन बसलंय. मुंबईत कोणत्या दिवशी कोणतं संकट कधी येऊन धडकेल याचा...
Modi Kalyan Sabha : उद्या बुधवार 15 मेच्या PM MODI यांच्या जाहीर सभेसाठी कल्याण पश्चिमेत जय्यद तयारी, वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल
रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट; बजेटचा आकडा पहाच!
इथे लोकांचा जीव जातोय अन् ही नाचतेय..; मन्नारा चोप्राचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
अजित पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल
दिल्ली दारू धोरण प्रकरणात ‘आप’ला आरोपी बनवण्यात येईल, EDची हायकोर्टात माहिती
शिक्षक व पदवीधर निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा निर्णय