सावंतवाडी-दोडामार्गची 25 गावे पर्यावरण संवेदनशील; अधिसूचना जारी करा, हायकोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

सावंतवाडी-दोडामार्गची  25 गावे पर्यावरण संवेदनशील; अधिसूचना जारी करा, हायकोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

सावंतवाडी-दोडामार्गमधील 25 गावे पर्यावरण संवेदनशील असल्याची अधिसूचना जारी करा, असे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. येथील पर्यावरण वाचवण्यासाठी गेली 14 वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. न्यायालयाच्या या आदेशाने येथील पर्यावरणाचे संवर्धन होईल.

ही गावे पर्यावरण संवेदनशील जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने चार महिन्यांत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवावा. पुढील दोन महिन्यांत अधिसूचना काढण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू करावी. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चार महिन्यांत अंतिम अधिसूचना केंद्र सरकारने जारी करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

आवाज फाऊंडेशनने 2012 तर वनशक्ती संस्थेने 2914मध्ये यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने या याचिका निकाली काढताना वरील आदेश दिले.

झाडे कापू नका

येथील झाडे न कापण्याचे अंतरिम आदेश याआधी न्यायालयाने दिले आहेत. ही गावे पर्यावरण संवेदनशील जाहीर करण्याची अधिसूचना निघेपर्यंत हे अंतरिम आदेश कायम राहतील, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

टास्क फोर्स तयार करा

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी टास्क फोर्स तयार करा. टास्क फोर्समध्ये एका अधिकाऱयाची सचिव म्हणून नियुक्ती करा. टास्क फोर्सने न्यायालयाच्या आदेशाची माहिती सर्व संबंधित अधिकाऱयांना द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तक्रार नोंदवता येणार

या गावांमध्ये पर्यावरणाची हानी किंवा झाडांची कत्तल केली जात असल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र टेलिफोन नंबर, ई-मेल व सोशल मीडिया माध्यम टास्क फोर्सने तयार करावे. यावर तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

काय आहे प्रकरण

दोडामार्ग येथील गावांतील तब्बल 18 लाख झाडांची कत्तल करण्यात आली आहे. येथील पर्यावरणाची हानी होत आहे. सिंधुदुर्गदोडामार्ग येथे दुर्मिळ वनस्पती व प्राणी आहेत. काही प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. या प्रजाती केवळ येथेच आहेत. त्यामुळे ही गावे पर्यावरण संवेदनशील जाहीर करावीत, अशी मागणी आवाज फाऊंडेशनने याचिकेत केली होती. वनशक्ती संस्थेच्या याचिकेतही अशीच मागणी करण्यात आली होती.

 

गावांची नावे

सावंतवाडी ः असानिये, पाडवे माजगाव, भलावल, तांबोळी, सरमळे, दाभीळ, ओटवणे, कोनस, घार्पी, उदेली, केसरी-फणसवाडी, नेवळी

दोडामार्ग ः कुंबर्ल, पंर्तुली, तालकत, झोलांबे, कोलझर, शिरवळ, उघडे, कळणे, भिकेकोनल, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा
अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी...
सोळाव्या वर्षी लग्न, सेल्स गर्लचं काम, अपघातात जीव गमावलेली पवित्रा जयराम कोण होती?
‘या’ कुटुंबातील एकटा मुलगा कमावतो कोट्यवधींची माया, जगतात रॉयल आयुष्य
‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता स्पॅनिश उद्योजकाला करतेय डेट, एग्स फ्रीज करण्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
महिन्याभरात दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार, चंद्रपुरातील मतदानाची चर्चा
माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा
कोपरगावमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान उत्स्फूर्त प्रतिसाद