यंदाची लोकसभा निवडणूक सर्वाधिक महागडी ठरणार! देशातील निवडणूक खर्च 1.16 लाख कोटींच्या वर

यंदाची लोकसभा निवडणूक सर्वाधिक महागडी ठरणार! देशातील निवडणूक खर्च 1.16 लाख कोटींच्या वर

यंदाची 18 वी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरू शकते. हिंदुस्थानातील निवडणूक खर्च यंदा 1.16 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. सेंट्रल फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार, 2019 मध्ये देशातील निवडणुकीचा एकूण खर्च सुमारे 60 हजार कोटी रुपये होता आणि त्या वेळी ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरली होती.

निवडणूक आयोगाच्या खर्चाव्यतिरिक्त, देशातील 2019 च्या निवडणुकीत झालेल्या एकूण खर्चामध्ये राजकीय पक्ष, निवडणुकीत उभे असलेले उमेदवार आणि इतर प्रकारच्या खर्चांचाही समावेश आहे. मात्र 2020 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेने हिंदुस्थानला सर्वात महागडय़ा निवडणुकीत मागे टाकले. अमेरिकेने त्या निवडणुकीत एकूण 14 अब्ज डॉलर्स खर्च केले होते.

वर्ष 1998 मध्ये भाजपने निवडणुकीवर सुमारे 20 टक्के खर्च केला होता. वर्ष 2019 मध्ये भाजपचा खर्च वाढून 45 टक्क्यांवर गेला. त्याचप्रमाणे वर्ष 2009 मध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या एकूण खर्चाच्या 40 टक्के खर्च केला, तर 2019 मध्ये तो 10-15 टक्क्यांवर आला. गेल्या 26 वर्षांत देशात सहा लोकसभा निवडणुका झाल्या आणि यादरम्यान निवडणूक खर्च नऊ हजार कोटींवरून 60 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

यंदा निवडणूक खर्चात 35 टक्क्यांनी वाढ

निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये असताना ही खर्च मर्यादा 2022 मध्ये 95 लाख रुपये करण्यात आली. त्यानुसार यंदा निवडणुकीतील उमेदवारांचा खर्च 35 टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच उमेदवारांचा 24 हजार कोटी रुपयांचा खर्च 32 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय निवडणूक आयोगाचा खर्च आणि राजकीय पक्षांच्या खर्चातही वाढ होणार असल्याने या निवडणुकीतील खर्च एक लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

2019 च्या निवडणुकीतील खर्च

एकूण खर्च – सुमारे 60 हजार कोटी

उमेदवार – 24 हजार कोटी (40 टक्के)

राजकीय पक्ष – 20 हजार कोटी (35 टक्के)

सरकार, निवडणूक आयोग – 10 हजार कोटी (15 टक्के)

प्रसारमाध्यमे – 3 हजार कोटी (5 टक्के)

इतर खर्च – 3 हजार कोटी (5 टक्के)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी