अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला

अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल दिसत असून भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे महाराष्ट्रात सातत्याने दौरे होत आहेत. राज्यात 45 प्लस जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातून ते स्वप्न पूर्ण होणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे राज्यात जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी मोदी आणि शहा दौरे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यात सभा होणार आहे. या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

अतिथी देवो भव! ही आपली संस्कृती आहे. जे पाहुणे येतील, त्यांचे आम्ही स्वागतच करणार आहेत. तुतारी वाजवून आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. त्यांचेही आम्ही तुतारी वाजवून स्वागत करू, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.पूनम महाजन यांचे तिकीट कापल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पूनम महाजन यांनी अनेक वर्षे चांगले काम केले आहे. त्यांचे वडील प्रमोद महाजन हे केवळ भाजपच नाही तर देशाच्या राजकारणातील एक मोठे नेते होते. त्यांचे तिकीट कापण्यात आले, हे आश्चर्यंकारक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
मुंबईला जपणे, जोपासण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बेस्ट, विजेचे माफक दर, 500 फुटांपर्यंतची घरे करमुक्त केली, मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला...
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला
लोकशाहीवर विश्वास नसणारे भाजप सरकार हद्दपार करा; शरद पवार यांची कल्याणमध्ये विराट सभा
दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!