तळवडे- मागील पंधरा दिवसांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून शहरातील अनेक संस्था,संघटना, राजकीय नेत्यांनी शहरातील रूग्णालयाचे ऑडीट करावे अशी मागणी केली होती. मागणीनंतर खरंच ऑडीट सुरु केले,की नाही याबाबत कोणीही शहानिशा केली नाही. मात्र भाजपा महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा अस्मिता भालेकर यांनी ऑडीटबद्दलचा आढावा घेऊन, संबधिंत विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच उर्वरीत राहीलेल्या ऑडीटचे काम लवकरात-लवकर पूर्ण करण्याची मागणीही केली.
भाजपा महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा अस्मिता भालेकर यांनी शहरातील रूग्णालयांच्या ऑडीटबद्दल काय कामकाज सुरु आहे, याबाबत आढावा घेतला. दोन दुवसांपूर्वी संबधिंत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा केली. अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या विभागाकडे ऑडीटच्या कुठल्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत, त्यानुसार काय आणि किती कामकाज पूर्ण करण्यात आले त्याबाबत चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्या तसेच शासकीय इमारतींचे ऑडीट अग्निशमन आणि विद्युत विभाग यांच्या समन्वयातून सुरु असल्याचे किरण गावडे यांनी सांगितले. तर खासगी रूग्णालयांचे ऑडीट वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून निवड केलेल्या एजन्सी च्या माद्यमातून केले जात असल्याची माहिती देण्यात आली. सद्याच्या स्थितीला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे ऑडीट पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरीत रूग्णालय तसेच शासकीय इमारतींचे ऑडीट लवकरात-लवकर करावे अशी मागणी भालेकर यांनी केली.
याबाबत अधिक माहिती देताना अस्मिता भालेकर म्हणाल्या, भंडारा रूग्णालयात घटना घडल्यानंतर अनेकांनी ऑडॉटची मागणी केली. या घटनेला पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. त्यावर आपल्या प्रशासनाने काय पावले उचलली आहेत. ऑडीटची कामे कशी सुरु आहेत. याचा आढावा घेणे आवश्यक होते. त्यामुळे संबधिंत विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यासोबत उर्वरीत रूग्णालयांचे ऑडीट लवकर करावे अशी मागणी करण्यात आली.