नवी दिल्ली | गेमिंग चाहत्यांना एक जबरदस्त गुड न्यूज आहे. Lenovo चा गेमिंग स्मार्टफोन Lenovo Legion ची गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चा सुरू आहे. या फोनची अनेकांना फार उत्सूकता आहे. आता कंपनीने या फोनच्या लाँचिंग तारखेची घोषणा केली आहे.लेनोवो या फोनला २२ जुलै रोजी लाँच करणार आहे. २२ जुलै रोजी चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात येणार आहे. भारतात या फोनला कधी लाँच करणार आहे, याविषयी कंपनीने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. परंतु, चीनमध्ये लाँचिंगनंतर भारतीय बाजारात या फोनला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
चीनच्या सोशल मीडिया अॅप Weibo वर एक पोस्ट करण्यात आली आहे. यावरून फोनच्या लाँचिंगची तारीख समोर आली आहे. या पोस्टमध्ये फोनच्या प्रोसेसर संबंधी माहिती दिली आहे. पोस्टवरून हा फोन स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसरसोबत येणारा जगातील पहिला फोन आहे. या प्रोसेसरवरून फोनला १० टक्के चांगला GPU आणि CPU मिळणार आहे. फोनमध्ये वाय फाय ६ सपोर्ट सोबत ड्यूल मोड ५ जी कनेक्टिविटी सुद्धा मिळणार आहे.
फोनमध्ये कंपनी 64MP प्रायमरी कॅमेरा देणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP पॉप अप मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये 144Hz चे रिफ्रेश रेट देण्यात येणार आहे.
फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या पॉवरफुल बॅटरी सोबत फास्ट चार्जिंगसाठी या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. तसेच पॉवरफुल स्पीकर्स, ड्यूल कूलिंग सिस्टम दिला जाणार आहे. लेनोवाचा हा जबरदस्त फोन अँड्रॉयड १० आऊट ऑफ द बॉक्स सोबत येईल.